महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Pulwama Encounter : पुलवामामध्ये दहशतवाद्यांचा जवानांवर गोळीबार - जम्मू काश्मीर पोलीस

दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी सकाळी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. गुरूवारी सकाळी पुलवामा जिल्ह्यातील नैना बाटपोरा या गावात चकमक सुरू झाली. आणि काही वेळातच दहशतवाद्यांच्या माहितीनंतर सुरक्षा दलांनी वेढा घातला.

जवानांवर गोळीबार
Pulwama Encounter

By

Published : Mar 10, 2022, 12:34 PM IST

Srinagar: दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी सकाळी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. गुरूवारी सकाळी पुलवामा जिल्ह्यातील नैना बाटपोरा गावात ही चकमक सुरू झाली. आणि काही वेळातच दहशतवाद्यांच्या माहितीनंतर सुरक्षा दलांनी वेढा घातला. "#पुलवामाच्या नैना बाटपोरा भागात चकमक सुरू झाली आहे. पोलिस आणि सुरक्षा दल घटनास्थळी आहेत." असे काश्मीर पोलिसांनी ट्विटमध्ये लिहिले आहे.

सुरक्षा दलांचा संशयित क्षेत्राजवळ आले असता, अतिरेक्यांनी जवानांवर गोळीबार केला. या चकमकीत ठिकाणी दोन अतिरेकी अडकल्याचा अंदाज आहे.

हेही वाचा -AAP crosses majority mark in Punjab : आप पंजाबमध्ये स्पष्ट बहुमत मिळण्याच्या वाटचालीकडे; 88 जागांवर आघाडी, प्रस्थापित नेत्यांवर पराभवाची छाया

ABOUT THE AUTHOR

...view details