जम्मू : जम्मू- काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातील मुंझ मार्ग भागात चकमक सुरू झाली आहे. पोलीस आणि सुरक्षा दल दहशतवाद्यांशी लढत आहेत. प्रतिबंधित दहशतवादी संघटनेचे तीन दहशतवादी मारले गेले. दहशतवाद्यांची ओळख पटवली जात आहे. काश्मीर झोन पोलिसांनी सांगितले की, सुरक्षा दलाच्या पथकाला दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाली होती. सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला असून शोध मोहीम सुरू केली आहे. दरम्यान, दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. ( Encounter in Shopian Area )
Encounter in Shopian : शोपियानमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार
जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात मंगळवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले. पोलिसांनी ही माहिती दिली. ( Encounter in Shopian Area )
लष्कराचे तीन दहशतवादी ठार
शोपियानचे लतीफ लोन, नेपाळचे टिल बहादूर थापा, काश्मिरी पंडित पुराण कृष्ण भट आणि अनंतनागचे उमर नझीर यांच्या खून प्रकरणात ठार झालेल्या दहशतवाद्यांपैकी २ दहशतवादींचा हात होता. शोपियानमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, तेथे अतिरेकी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली. शोपियान जिल्ह्यातील झैनापोरा येथील मांज मार्ग भागात ही चकमक झाली.
Last Updated : Dec 20, 2022, 9:25 AM IST