अनंतनाग: दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील तंगपावा भागातील कोकरनाग येथे दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत दोन दहशतवादी ( Encounter Started In Kokernag ) ठार झाला आहेत. दहशतवाद्याची ओळख पटलेली नाही. सध्या चकमक सुरू आहे. रविवारी रात्री उशिरा ही चकमक सुरू झाली. या परिसरात दोन ते तीन दहशतवादी लपून बसल्याचा ( Encounter Jammu Kashmir ) संशय आहे.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, रविवारी संध्याकाळी उशिरा कोकरनागमध्ये दहशतवादी लपल्याची गुप्त माहिती मिळाली ( Encounter update ) होती. यानंतर भारतीय लष्कर, जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफच्या 19 आरआरच्या संयुक्त पथकाने परिसराला घेराव घालून शोध मोहीम सुरू केली. यादरम्यान सुरक्षा दल पुढे जात असताना तेथे लपलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर ( Encounter Jammu Kashmir news ) दिले.