महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कुपवाडा जम्मू काश्मीरच्या चकतरा कंडी क्षेत्रामध्ये चकमक, दोन दहशतवादी ठार - कुपवाड़ा में सुरक्षा बलों और आतंकियों के बीच मुठभेड़

कुपवाडा येथील चकतरा कंडी भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. काश्मीर झोन पोलिसांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. दोन दहशतवाद्यांनी कंठस्नान घालण्यात आले.

चक्र कंडी भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक
चक्र कंडी भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक

By

Published : Jun 7, 2022, 7:21 AM IST

Updated : Jun 7, 2022, 7:39 AM IST

श्रीनगर :उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील कंडी भागात सकाळीच झालेल्या चकमकीत एका परदेशी दहशतवाद्यासह दोन दहशतवादी ठार झाले. आयजीपी काश्मीरच्या वतीने, काश्मीर पोलिस झोनने ट्विट करुन ही माहिती दिली. तुफैल नावाच्या एका पाकिस्तानी अतिरेक्यासह एलईटी संघटनेचे दोन अतिरेकी ठार झाले. शोध अजूनही सुरू आहे. असे ट्विटमध्ये म्हटले आहे.जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दल आणि पोलिसांची कारवाई अजूनही सुरू आहे. एका माहितीच्या आधारे कुपवाडा येथील चकतरा कंडी परिसरात शोध मोहीम राबवण्यात आली. शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांसोबत चकमक सुरू झाली. पोलीस आणि लष्कर कारवाई करत आहे. विशेष म्हणजे 3 जून रोजी रात्रभर झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी हिजबुल कमांडरचा खात्मा केला होता.

उत्तर काश्मीरमध्ये कालही झाली होती चकमक - बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर पानीपोरा जंगलात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एलईटीचा एका दहशतवादीला कंठस्नान घातले आहे. दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाले असून त्यांचा शोध सुरू आहे. एका पोलिसांनी सांगितले की, सुरक्षा दलांना सोमवारी ( दि. 6 जून ) संध्याकाळी सोपोरच्या पानीपोरा जंगल परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार लष्कर आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने परिसराला वेढा घातला. ताज्या माहितीनुसार या चकमकीत लष्कर-ए-तैयबाशी संबंधित एक विदेशी दहशतवादी मारला गेला. अतिरेक्याकडून दारूगोळाही जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चकमकीत एक स्थानिक आणि दोन विदेशी दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाले.

Last Updated : Jun 7, 2022, 7:39 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details