महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

जम्मू-काश्मीरः अवंतीपुरा सोरामधील चकमकीत एकूण ४ दहशतवाद्यांचा खात्मा, ३ दिवसात १० दहशतवाद्यांना कंठस्नान - अवंतीपोरामध्ये सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना घेरले

काश्मीर खोऱ्यात 2 ठिकाणी चकमकी झाल्या. श्रीनगरच्या सोरामध्ये एलईटीचे 2 दहशतवादी ठार करण्यात आले. त्यांच्याकडून 1 एके-47 आणि एक पिस्तूल मिळाले. अवंतीपोरा चकमकीत, टीव्ही कलाकार अमरीन भटच्या हत्येप्रकरणी एलईटीचे 2 दहशतवादी मारले गेले. एकूण 10 दहशतवादी गेल्या तीन दिवसांत मारले गेले. त्यामध्ये 7 एलईटीचे तर 3 जैशचे होते अशी माहिती विजय कुमार, आयजीपी काश्मीर यांनी दिली.

AWANTIPORA
AWANTIPORA

By

Published : May 26, 2022, 10:58 PM IST

Updated : May 27, 2022, 6:45 AM IST

श्रीनगर: काल रात्री काश्मीर खोऱ्यात 2 ठिकाणी चकमकी झाल्या. श्रीनगरच्या सोरामध्ये एलईटीचे 2 दहशतवादी ठार करण्यात आले. त्यांच्याकडून 1 एके-47 आणि एक पिस्तूल मिळाले. अवंतीपोरा चकमकीत, टीव्ही कलाकार अमरीन भटच्या हत्येप्रकरणी एलईटीचे 2 दहशतवादी मारले गेले. एकूण 10 दहशतवादी गेल्या तीन दिवसांत मारले गेले. त्यामध्ये 7 एलईटीचे तर 3 जैशचे होते अशी माहिती विजय कुमार, आयजीपी काश्मीर यांनी दिली.

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा भागातील हांजीपोरा भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली होती. या संदर्भात आयजीपी काश्मीर यांनी सांगितले की, सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकासोबत झालेल्या चकमकीत दोन ते तीन दहशतवादी अडकले होते. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू होता. आयजीपीच्या म्हणण्यानुसार, चकमकीत सहभागी दहशतवाद्यांचा टीव्ही अभिनेत्री अमरीन भटच्या हत्येत सहभाग होता. या दहशतवाद्यांना घेरण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

AWANTIPORA

एक दिवस आधी बुधवारी रात्री उशिरा टीव्ही अभिनेत्री अमरीन भटची दहशतवाद्यांनी हत्या केली होती. दहशतवाद्यांनी अमरीन यांच्या १० वर्षांच्या पुतण्यालाही गोळ्या घातल्या. मात्र, तो धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे. दहशतवाद्यांनी दोन दिवसांपूर्वी पोलीस कर्मचारी आणि त्याच्या मुलाची गोळ्या झाडल्या होत्या. या हल्ल्यात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला, तर मुलगी जखमी झाली. मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अवंतीपोरामध्ये सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना घेरले, चकमक सुरू

काश्मीरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने दहशतवादी हल्ले होत आहेत. यामध्ये हिंदू आणि मुस्लिम दोघेही टार्गेटवर आहेत. त्याच दिवशी पाकिस्तानकडून घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या तीन दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी ठार केले. एक दिवसापूर्वीच दिल्ली न्यायालयाने फुटीरतावादी नेता यासिन मलिक याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. याबाबत काश्मीरमधील अनेक नेत्यांनी नाराजीही व्यक्त केली.

हेही वाचा -Avinash Bhosale Arrested CBI : पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसलेंना सीबीआयकडून अटक

Last Updated : May 27, 2022, 6:45 AM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details