पुलवामा - काश्मीरच्या खोऱ्यात शांततेला सुरुंग लावणाऱ्या दहशतवाद्यांचा नेस्तानाबूत करण्यासाठी सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे.दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्याती त्राल येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये मोठी चकमक सुरू आहे. या चकमकीत एका दहशतवाद्याला ठार करण्यात आले आहे. शम सोफी असे या दहशतवाद्याचे नाव आहे. हा जैश दहशतवादी संघटनेचा कमांडर होता.
अधिकाऱ्याच्या माहितीनुसार पोलिसांचे पथक, सैन्यदलाची 42 आरआर आणि सीआरपीएफ 189 बीएन यांच्या संयुक्त पथकाने वाग्गड भागातील तलवाना मोहल्ल्यात शोध मोहिम सुरू केली आहे. या भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती.
हेही वाचा-लग्नासाठी म्हणून धर्मांतर करणारे हिंदू चूक करत आहेत- मोहन भागवत
अधिकाऱ्याने सांगितले की, सुरक्षा दलाच्या टीमने संशयित ठिकाणी जोरदार शोध मोहिम सुरू केली. तेव्हा दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्यावर सुरक्षा दलाच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. या भागात अद्याप चकमक सुरू आहे. दोन ते तीन दहशतवादी लपून बसल्याचा सुरक्षा दलाला संशय आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांच्या माहितीनुसार एका दहशतवाद्याला ठार करण्यात आले आहे. ऑपरेशन सुरू आहे. काश्मीर झोनचे आयजी विजय कुमार यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. जैश कमांडर शम सोफी असे मृत दहशतवाद्याचे नाव आहे.