श्रीनगर- सुरक्षा दलाकडून दहशतवाद्यांविरोधात जम्मू काश्मीरमध्ये कारवाई सुरू आहे. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये बांदीपोरा येथे चकमक सुरू असल्याचे पोलिसांनी मंगळवारी सांगितले. काश्मीर झोन पोलिसांनी ट्विट करून बांदीपोरा एन्काउन्टरमध्ये अज्ञात दहशतवादी ठार झाल्याची माहिती दिली आहे.
सुरक्षा दलाने दहशतवाद्यांना पकडण्यासाठी संयुक्त शोधमोहिम बांदीपोरा येथील चंदाजी परिसरात राबविण्यास सुरुवात केली. त्या ठिकाणी दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
हेही वाचा-भारत-चीनमधील कॉर्पस कंमाडर पातळीवरील चर्चा विधायक
शोधमोहिम सुरू असताना दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार सुरू केला. यावेळी प्रत्युत्तरादाखल सैन्यदलाने गोळीबार केला. सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
हेही वाचा-Tokyo Olympics: भारताची भालाफोकपटू अन्नू राणी अंतिम फेरीत पोहोचण्यास अपयशी
सुरक्षा दलाने चालू वर्षात 89 दहशतवाद्यांना केले ठार
जम्मू-काश्मीरमध्ये चालू वर्षात आतापर्यंत सुरक्षा दलांनी सात पाकिस्तानी नागरिकांसह 89 दहशतवाद्यांना ठार केले आहे. ही माहिती लष्कर आणि पोलिसांच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या कमी आहे. परंतु यावर्षी अधिक कमांडर मारले गेले, असल्याचे संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित करताना काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक (आयजीपी) विजय कुमार यांनी नुकतेच सांगितले.