महाराष्ट्र

maharashtra

छत्तीसगड : एका लाखाचे बक्षीस असलेला नक्षलवादी ठार

By

Published : Apr 11, 2021, 7:29 PM IST

छत्तीसगडमधील दंतेवाडात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली असून एका लाखाचे बक्षीस असलेल्या नक्षलवाद्याला ठार करण्यात पोलिसांना यश आले आहे.

छत्तीसगड
छत्तीसगड

रायपूर -छत्तीसगडमधील दंतेवाडात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. या चकमकीत एका लाखाचे बक्षीस असलेल्या नक्षलवाद्याला ठार करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी नक्षलवाद्याचा मृतदेह ताब्यात घेतला. वेट्टी हूंगा असे नक्षलवाद्याचे नाव आहे. त्याच्यावर एका लाखाचे बक्षीस होते. तसेच पोलिसांनी घटनास्थळावरून 2 किलो आयईडी जप्त केला आहे.

छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये सुरक्षा दले आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीमध्ये 22 जवानांना वीरमरण प्राप्त झाले. सर्च ऑपरेशनदरम्यान जवानांना टेकडीवर नक्षलवाद्यांनी घेरले. चोहीबाजूने गोळीबार केला. गोळीबार इतका झाला की हुतात्मा सैनिकांचे मृतदेहही उचलू शकले नसल्याचे कॉन्स्टेबल देवप्रकाश यांनी सांगितले.

सुरक्षा दलाच्या 1 हजार 500 जवानांची एक तुकडी बीजापूर-सुकमा जिल्ह्याच्या सीमाक्षेत्रात शोधमोहीम राबवत होती. तर दुसरीकडे नक्षलवाद्यांच्या बाजूने वांछित माओवादी कमांडर आणि 'पीपल्स लिबरेशन गोरिल्ला आर्मीच्या बटालियन नंबर एक'चा नेता हिडमा आणि त्याची सहकारी सुजाता यांच्या नेतृत्त्वाखाली सुमारे 400 नक्षलवादी एकत्र आले होते. यावेळी सुमारे 400 नक्षलवाद्यांनी दीड हजार जवानांच्या एका तुकडीला घेराव घालत त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला होता. या चकमकीमध्ये 22 जवानांना वीरमरण प्राप्त झाले. तर या चकमकीत 25 हून अधिक नक्षलवादीही ठार झाल्याची सीआरपीएफचे महासंचालक कुलदीप सिंह यांनी दिली होती.

हेही वाचा -निकालाआधीच तामिळनाडूत काँग्रेस उमेदवाराचा मृत्यू; जिंकल्यास पोटनिवडणूक

ABOUT THE AUTHOR

...view details