महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Encounter In Wanigam Baramulla : एका दहशतवाद्याला यमसदनी पाठविले, बारामुल्लाच्या वानिगम बाला भागात चकमक सुरू - बारामुल्ला जिल्ह्यात चकमक

जम्मू-काश्मीरमधील ( Jammu and Kashmir ) बारामुल्ला जिल्ह्यातील वानिगम बाला भागात सुरू असलेल्या चकमकीत ( Encounter in Baramulla district ) जवानांनी एका दहशतवाद्याला ठार केले आहे. अद्यापही चकमक सुरू आहे.

encounter
जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील वानिगम बाला भागात चकमक

By

Published : Jul 30, 2022, 7:56 AM IST

Updated : Jul 30, 2022, 10:16 AM IST

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील ( Jammu and Kashmir ) बारामुल्ला जिल्ह्यातील वानिगम बाला भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत ( Encounter in Baramulla district ) एक दहशतवादी ठार झाला आहे. आणखी काही दहशतवादी लपले असण्याची शक्यता आहे. सुरक्षा दलांनी परिसराला घेराव घालून शोधमोहीम राबवली आहे. सध्या चकमक सुरू आहे.

जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील वानिगम बाला भागात चकमक

जम्मू-काश्मीरमधीलबारामुल्ला जिल्ह्यातील वानिगम बाला भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली आहे. यावर कारवाई करत स्थानिक पोलीस आणि सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आणि शोध मोहीम सुरू केली. सुरक्षा दल दहशतवाद्यांच्या लपण्याच्या दिशेने सरकताच लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर हल्ला केला आणि गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलांनीही गोळीबार करून प्रत्युत्तर दिले. यामुळे दोन्ही पक्षांमध्ये चकमक सुरू झाली आहे.

अलीकडेच जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील रामपोरा भागात चकमक झाली होती. पोलीस आणि सुरक्षा दलाच्या पथकाने काही दहशतवाद्यांना घेरले आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले की, सुरक्षा दलाच्या जवानांनी घटनास्थळी आपले काम पार पाडले. दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील कैमोह भागातील रामपोरा गावात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली, असे अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले. यापूर्वी, जम्मू-काश्मीरमधील पुलवामा भागात एका गूढ स्फोटात दोन मजूर जखमी झाले होते. दोघांनाही श्रीनगरच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

हेही वाचा -Maratha Reservation : मराठा समाजाला मोठा धक्का, EWS आरक्षण उच्च न्यायालयाकडून रद्द

Last Updated : Jul 30, 2022, 10:16 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details