महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 24, 2023, 6:53 PM IST

ETV Bharat / bharat

Emotional Complaint Gwalior Children : 'पोलीस काका, तुम्ही आमच्या बाबांना पकडाल का?', निष्पाप बहिणींची पोलिसांकडे मागणी

ग्वाल्हेरमध्ये वडिलांच्या त्रासाला कंटाळून दोन निष्पाप मुली सरळ पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्या. तेथे त्यांनी पोलिसांकडे विनवणी केली की आमचे वडील आमच्या आईला खूप मारतात, त्यामुळे त्यांना अटक करा. यानंतर पोलिसांनी त्या मुलींच्या वडिलांना समजावून सांगत पुन्हा असे न करण्याची सूचना केली.

Emotional Complaint Gwalior Children
पोलिसांकडे वडिलांना अटक करण्याची मागणी

पहा व्हिडिओ

ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) : पालकांचे भांडण मुलांच्या मनावर किती खोलवर परिणाम करू शकते याचे उदाहरण मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमधून समोर आले आहे. ग्वाल्हेर जिल्ह्यातील भितरवार येथे दोन निष्पाप मुलींनी वडिलांच्या वागण्याने व्यथित होऊन थेट पोलीस स्टेशन गाठले. तिथे त्या निष्पाप मुलींना स्टेशन प्रभारींना सांगितले की, आमचे वडील आमच्या आईला खूप मारहाण करतात. तुम्ही त्यांना पकडाल का? मुलींचे हे म्हणणे ऐकून स्टेशन प्रभारी भावूक झाले. त्यानंतर ते मुलींना घेऊन त्यांच्या घरी पोहोचले. घरी पोहोचल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या वडिलांना पुन्हा असे न करण्याची सूचना केली आणि दोघांना एकमेकांशी भांडण न करता प्रेमाने राहण्याचा सल्ला दिला.

या प्रकरणावरून झाले भांडण : ग्वाल्हेरच्या भितरवार पोलीस स्टेशनमध्ये दोन निष्पाप सख्ख्या बहिणी जेव्हा पोलिसांची मदत घेण्यासाठी पोहोचल्या तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. मुली पोलिस ठाण्यात पोहोचताच पोलिस स्टेशनचे प्रभारी प्रशांत शर्मा यांनी त्यांना आधी खुर्चीवर बसवले आणि नंतर त्यांची संपूर्ण कहाणी ऐकून घेतली. यावेळी मुली म्हणाल्या की, '2 दिवसांपूर्वी आमच्या आईने आम्हा दोघी बहिणींना कपडे आणण्यासाठी वडिलांकडे पैसे मागितले होते. त्यावरून वडील संतापले. आज दोघांमध्ये पुन्हा भांडण झाले तेव्हा त्यांनी मम्मीवर हातोड्याने वार केले. त्यामुळे मम्मीच्या पायाला दुखापत झाली. आमच्या आईला दोन दिवस चालता येत नव्हते. तुम्ही प्लीज त्यांना पकडा.'

आता दर आठवड्याला घेणार फीडबॅक : या लहान मुलींची तक्रार ऐकून स्टेशन प्रभारी प्रशांत शर्मा भावूक झाले. त्यानंतर ते मुलींना घेऊन तातडीने त्यांच्या घरी पोहोचले. सुरुवातीला त्यांनी त्यांच्या पालकांना फटकारले. नंतर दोघांनाही प्रेमाने राहण्याचा आणि मुलांसमोर v भांडण्याचा सल्ला दिला. नंतर या जोडप्याने पुन्हा कधीही भांडण न करण्याची शपथ घेतली. स्टेशन प्रभारी शर्मा यांनी मुलींच्या वडिलांना सांगितले की, ते दर आठवड्याला मुलींशी बोलतील आणि यादरम्यान जर पुन्हा मारामारी झाल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.

हेही वाचा :

  1. Snake In ATM : धक्कादायक! ATM मधून नोटांऐवजी निघू लागली चक्क सापांची पिल्ले!
  2. New Parliament Building : कॉंग्रेससह 19 विरोधी पक्षांचा नव्या संसद इमारतीच्या उद्घाटनावर बहिष्कार
  3. Ramoji Film City : 'रामोजी फिल्म सिटी'सारखी फिल्म सिटी संपूर्ण देशात बनली पाहिजे!

ABOUT THE AUTHOR

...view details