महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Flight Emergency Landing: सुरतहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे अहमदाबादमध्ये इमर्जन्सी लँडिंग, इंजिनला धडकला पक्षी - इंडिगो विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

सुरतहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे आज इमर्जन्सी लँडिंग अहमदाबादमध्ये करण्यात आले आहे. माहितीनुसार, पक्ष्याच्या धडकेमुळे या विमानाचे लँडिंग करण्यात आले आहे. या घटनेबाबत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने एक निवेदन प्रसारित केले आहे.

Flight Emergency Landing
इंडिगो विमान

By

Published : Feb 26, 2023, 11:02 PM IST

अहमदाबाद:डीजीसीएने रविवारी अधिकृत निवेदनात घटनेविषयी माहिती दिली. यानुसार, सुरतहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे अहमदाबादमध्ये आपत्कालीन लँडिंग करण्यात आले आहे. विमानाला पक्षी आदळल्यानंतर या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याचे सांगण्यात आले. नागरी उड्डयन महासंचालनालयाने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, इंडिगो A320 विमान VT-IZI ऑपरेटिंग फ्लाइट 6E-646 (सूरत-दिल्ली) ला सुरत येथे टेकऑफ करताना पक्षी धडकला होता.

इंजिन फॅन ब्लेडमध्ये दोष: डीजीसीएने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यानंतर विमान अहमदाबादकडे वळवण्यात आले. यामध्ये N1 कंपन 4.7 युनिट होते. या घटनेनंतर विमान अहमदाबादमध्ये सुरक्षित उतरविण्यात आले. DGCA च्या अधिकृत निवेदनानुसार, विमानाच्या तपासणीदरम्यान इंजिन फॅन ब्लेडमध्ये दोष आढळून आला. निवेदनात म्हटले आहे की, दुसऱया क्रमांकाच्या इंजिनच्या पंख्याचे ब्लेड खराब झाले होते. या विमानाला नंतर अधिकाऱ्यांनी 'एअरक्राफ्ट ऑन ग्राउंड' (AOG) घोषित केले.

वैद्यकीय आणीबाणीमुळे विमान भोपाळकडे: एअरलाइन्स कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यापूर्वी 25 फेब्रुवारी रोजी भोपाळमध्ये, दिल्ली-जाणाऱ्या इंडिगो फ्लाइटने कोचीन येथून उड्डाण केले होते आणि बोर्डवर वैद्यकीय आणीबाणीमुळे ते भोपाळला वळवण्यात आले होते. इंडिगो फ्लाइट 6E 2407 वर वैद्यकीय आणीबाणीमुळे कोचीन ते दिल्ली हे ऑपरेशन भोपाळकडे वळवण्यात आले आहे. इतर प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत.

प्रशासनाची तत्परता आली कामी: भोपाळ विमानतळाने या प्रकरणी एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, भोपाळमध्ये उतरल्यानंतर विमानतळाच्या टीमने एकही सेकंद वाया न घालवता प्रवाशांना त्वरित उतरवले आणि सर्वांना सुरक्षितपणे जवळच्या रुग्णालयात नेले.

स्पार्कमुळे आग: दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळावरून बेंगळुरूला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात 29 ऑक्टोबर, 2022 ठिणगी पडल्याने आग लागली. विमानात एकूण 184 हवाई प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित वाचले. स्पार्कमुळे विमान दिल्ली विमानतळावरच आपत्कालीन स्थितीत थांबवावे लागले. विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. विमानात सुमारे 184 हवाई प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते असे सांगण्यात येत आहे.

पर्यायी विमानाची व्यवस्था: इंडिगो एअरलाइनने दिलेल्या माहितीनुसार, फ्लाइट क्रमांक 6E-2131 रात्री दिल्लीहून बंगळुरूला निघाले होते. तांत्रिक बिघाडामुळे त्यांना टेक ऑफ दरम्यान दिल्ली विमानतळावर परत थांबावे लागले. विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित वाचले. सर्व हवाई प्रवाशांसाठी पर्यायी विमानाची व्यवस्था करण्यात आली होती.

इंजिनला स्पार्कमुळे आग: या प्रकरणाची पुष्टी करताना डीसीपी विमानतळ तनु शर्मा यांनी सांगितले की, शुक्रवारी रात्री 10:08 वाजता इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय नियंत्रण कक्षाला सीआयएसएफ नियंत्रण कक्षाकडून माहिती मिळाली की फ्लाइट क्रमांक 6 ई-2131 च्या इंजिनला स्पार्कमुळे आग लागली. हे विमान दिल्लीहून बंगळुरूला जात होते. यात एकूण १८४ हवाई प्रवाशांसह ७ क्रू मेंबर्स उपस्थित होते.

तात्काळ उड्डाण रद्द : विमान उड्डाण रनवेवर उड्डाण करण्यासाठी धावू लागले होते, तेव्हाच तांत्रिक समस्येमुळे विमानातून ठिणगी पडू लागली. चालकाने तात्काळ उड्डाण रद्द केले. सर्व प्रवासी आणि चालक दलातील सदस्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आणि दुसऱ्या विमानाने बेंगळुरूला पाठवण्यात आले.

हेही वाचा:Congress Sankalp 2024 : अदानींवरून राहुल, प्रियंका गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका, खरगेंचाही हल्लाबोल

ABOUT THE AUTHOR

...view details