भोपाळ : भारतीय हवाई दलाच्या अपाचे लढाऊ हेलिकॉप्टरचे शेतात लँडींग करण्यात आले. या हेलिकॉप्टरने ग्वालेर हवाई दलाच्या तळावरुन उड्डाण केले होते. मात्र या हेलिकॉप्टरने भिंड जिल्ह्यातील नयागाव परिसरात आपत्कालिन लँडींग केले. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली. हेलिकॉप्टरचे आपात्कालिन लँडींग झाल्याने गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या हेलिकॉप्टरच्या पायलटने प्रशिक्षणादरम्यान हे आपात्कालिन लँडींग केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
ग्वाल्हेर हवाई दलाच्या तळावरून उड्डाण :भारतीय वायुसेनेचे लँड केलेले हेलिकॉप्टर अपाचे अटॅक एएच 64ई हेलिकॉप्टर आहे. जे अतिशय धोकादायक असून लढाऊ हेलिकॉप्टर आहे. या हेलिकॉप्टरने सोमवारी सकाळी ग्वाल्हेर हवाई दलाच्या तळावरून उड्डाण केले होते. परंतु अचानक सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास भिंड जिल्ह्यातील नया गाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जाखनोली गावाजवळ हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. हे लँडिंग झाले, त्यावेळी हेलिकॉप्टरमध्ये हवाई दलाचे दोन वैमानिक उपस्थित होते.
ग्रामस्थांसह पोलिसांनी घेतली घटनास्थळी धाव : अचानक हेलिकॉप्टर गावांजवळील नाल्यात उतरल्याने ग्रामस्थ प्रचंड घाबरले. काही वेळातच हेलिकॉप्टरभोवती लोकांचा जमाव जमला. हेलिकॉप्टर नाल्याजवळ उतरल्याने गावकऱ्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. यानंतर उमरी पोलीस ठाणे आणि नयागाव पोलीस ठाण्याचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. भिंडचे पोलीस अधीक्षक मनीष खत्री यांनी हे प्रकरण हवाई दलाशी संबंधित आहे. त्यामुळे याबाबत हवाई दलाचे अधिकारी माहिती देतील असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
आपात्कालिन लँडिंगचे कारण गुलदस्त्यात : हेलिकॉप्टर अजूनही जखनोलीच्या दऱ्याखोऱ्यात उभे आहे. हवाई दलाला वैमानिकांकडून याची माहिती देण्यात आली आहे. हेलिकॉप्टरचे अचानक आपात्कालिन लँडिंग का करावे लागले, त्यात काही तांत्रिक बिघाड असल्याची कोणतीही माहिती यावेळी देण्यात आली नाही. पायलटसह पोलिसांनीही याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.
हेही वाचा -
- Terrorists Killed in Manipur : मणिपूर हिंसाचारानंतर आतापर्यंत 30 दहशतवादी ठार, आसाम रायफल्सची कारवाई
- FIR On Wrestlers : जंतरमंतरवर आखाडा; ब्रिजभूषण सिंह विरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंवर गुन्हा, आंदोलकांचे तंबूही उखडले
- Pakistani Drone in Amritsar : ड्रग्जची तस्करी करणारे पाकिस्तानी ड्रोन पुलमोरा सीमारेषेवर सुरक्षा जवानांनी पाडले