आग्रा ( उत्तरप्रदेश ) : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह ( defense minister rajnath singh ) यांच्या विमानाचे शुक्रवारी रात्री उशिरा आपत्कालीन लँडिंग करावे ( rajnath singh plane emergency landing ) लागले. त्यामुळे आग्रा येथील पोलीस आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली होती. याची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी विमानतळावर पोहोचले. खेरिया मोड विमानतळ ते सर्किट हाऊसपर्यंत मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दिल्लीतील खराब हवामानामुळे संरक्षणमंत्र्यांच्या विमानाचे आग्रा येथे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आग्रा विमानतळावर जवळपास 30 मिनिटे थांबले. दिल्लीतील हवामान स्वच्छ होताच त्यांचे विमान आग्राहून निघाले.
दिल्लीतील हवामान अचानक खराब :संरक्षण मंत्री राजनाथ सिंह शुक्रवारी रात्री लखनौहून दिल्लीला रवाना झाले. रात्री अचानक दिल्लीतील हवामान खराब झाले. त्यामुळे आग्रा विमानतळावर संरक्षणमंत्र्यांच्या विमानाचे अचानक इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. याची माहिती पोलिस व प्रशासनाला मिळताच अधिकाऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली. आग्रा एडीजी, आग्रा आयजी, एसएसपी आणि पोलीस तसंच प्रशासकीय अधिकारी विमानतळावर पोहोचले.