महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Rajmudra Navy New Flag नौदलाच्या ध्वजामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा आकार

पंतप्रधान नरेंद्र मोदी Prime Minister Narendra Modi यांच्या हस्ते आज भारतीय बनावटीची युद्धनौका आयएनएस विक्रांत नौदलाकडे सुपूर्द Indian made warship INS Vikrant handed to Navy करण्यात आली. याचवेळी नौदलाच्या नव्या ध्वजाचेही पंतप्रधान मोदींच्या हस्ते अनावरण new flag of Navy unveiled by Prime Minister करण्यात आले. या नव्या नौदलाच्या ध्वजामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचे चिन्ह वापरण्यात आले आहे. नव्या ध्वजामुळे ध्वजावरील पारतंत्र्याची निशाणी पुसली गेली आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

By

Published : Sep 2, 2022, 5:31 PM IST

Updated : Sep 2, 2022, 5:37 PM IST

Rajmudra Navy New Flag
Rajmudra Navy New Flag

पंतप्रधान नरेंद्र मोदी Prime Minister Narendra Modi यांच्या हस्ते आज भारतीय बनावटीची युद्धनौका आयएनएस विक्रांत नौदलाकडे सुपूर्द Indian made warship INS Vikrant handed to Navy करण्यात आली. याचवेळी नौदलाच्या नव्या ध्वजाचेही पंतप्रधान मोदींच्या हस्ते अनावरण new flag of Navy unveiled by Prime Minister करण्यात आले. या नव्या नौदलाच्या ध्वजामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचे चिन्ह वापरण्यात आले आहे. नव्या ध्वजामुळे ध्वजावरील पारतंत्र्याची निशाणी पुसली गेली आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

तिरंगा आणि राजमुद्रा...उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करीत म्हटले आहे की, आज प्रत्येक शिवभक्तासाठी, महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाचा आणि गौरवाचा क्षण आहे. पारतंत्र्याची आणखी एक निशाणी आज पुसली गेली आणि त्याजागी आपल्या लाडक्या, जाणत्या राजाची, शिवछत्रपतींच्या राजमुद्रेच्या आकारातील नवी निशाणी स्थापित झाली!

फडणवासी ट्विटमध्ये म्हणतात की, भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाले. आज आपण आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतो आहोत. पण नौदलाच्या ध्वजात आजही ब्रिटिशांच्या राजवटीतील खुणा तशाच होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पारतंत्र्याची प्रत्येक ओळख पुसली जावी, हा संकल्प केला होता. आज नौदलाच्या ध्वजावरील ब्रिटीशांची निशाणी पुसली गेली आहे.

सारगी सुरक्षा आणि नौदलाची प्रथम निर्मिती छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या दूरदृष्टीने केली होती. अतिशय भक्कम आणि मजबूत असे नौदल त्या काळात साकारण्यात आले होते. त्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण आणि शिवकार्याचा गौरव आज त्यानिमित्ताने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात झाला आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी Prime Minister Narendra Modi यांच्या हस्ते आज भारतीय बनावटीची युद्धनौका आयएनएस विक्रांत नौदलाकडे सुपूर्द Indian made warship INS Vikrant handed to Navy करण्यात आल्याने भारतीय नौदलाची ताकद आणखी वाढली आहे.

हेही वाचा -Devendra Fadnavis मी तुम्हाला महाराष्ट्रात नको आहे का ? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

Last Updated : Sep 2, 2022, 5:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details