न्यूयॉर्क -दीर्घ प्रतीक्षेनंतर इलॉन मस्क यांनी ट्विटरच्या मुख्यालयात प्रवेश केला. न्यायालयाच्या आदेशानुसार ४४ अब्ज डॉलरचा हा करार शुक्रवारपर्यंत पूर्ण व्हायचा आहे. यासोबतच मस्कने त्यांचा ट्विटर बायोही बदलला आहे. त्यांनी सर्वप्रथम त्यांच्या ट्विटर प्रोफाइलमध्ये 'ट्विटर हेडक्वार्टर' असा उल्लेख केला आहे.
इलॉन मस्क यांची ट्विटरच्या मुख्यालयाला अचानक दिली भेट; व्हिडिओ होतोय व्हायरल - Elon Musk at Twitter Headquarters
इलॉन मस्क काल बुधवारी (दि. २६ ऑक्टोबर)रोजी अचानक सॅन फ्रान्सिस्को येथील ट्विटरच्या मुख्यालयाला भेट दिली. दरम्यान, त्यांनी सोबत एक सिंकही नेला होता, जो पाहून सगळेच थक्क झाले. त्याचा व्हिडिओही शेअर केला आहे. तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
ट्विट सोशल मीडियावर व्हायरल -इलॉन मस्कने ट्विटरवर ऑफिसमध्ये पोहोचल्याचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर पोस्ट केला आहे, जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. वास्तविक, इलॉन मस्क यांनी ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये ते ट्विटर हेड क्वार्टरमध्ये एक सिंक घेऊन जाताना दिसत आहेत. ते स्वतः सिंक उचलतात आणि ऑफिसमध्ये जातात. त्यांनी व्हिडिओला कॅप्शन दिले आहे.
एक दिवसापूर्वी बँकर्सची बैठक झाली -ट्विटर ऑफिसमध्ये पोहोचण्याच्या एक दिवस आधी एलोन मस्क यांनी मंगळवारी या डीलमध्ये निधी उपलब्ध करून देणाऱ्या बँकर्ससोबत बैठक घेतली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बुधवारी ट्विटरच्या चीफ मार्केटिंग ऑफिसरने कर्मचाऱ्यांना एक मेल पाठवून कळवले की मस्क या आठवड्यात सॅन फ्रान्सिस्कोच्या मुख्यालयात कर्मचाऱ्यांना संबोधित करतील. शुक्रवारी लोकांना त्यांचे थेट म्हणणे ऐकता येणार आहे. डेलावेअर चॅन्सरी कोर्टाचे न्यायाधीश कॅथलीन मॅककॉर्मिक यांनी मस्क यांना हा करार पूर्ण करण्याचे आणि शुक्रवार, 28 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बंद करण्याचे आदेश दिले आहेत.