सॅन फ्रान्सिस्को : एलन मस्क यांची टेस्ला ही कार सध्या चांगलीच चर्चेत आहे. यासाठी एलन मस्क यांनी आता मेक्सिको या देशात टेस्लाचे उत्पादन सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे. याबाबतचा मास्टर प्लॅन ३ मस्क यांनी घोषित केला आहे. त्यासाठी एलन मस्क यांनी पारंपरिक जीवाश्म इंधनाला पर्याय म्हणून भविष्यातील शाश्वत उर्जेसाठी १० ट्रीलियन गुंतवणूक करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. टेक्सास येथील ऑस्टीनमधील गिगाफॅक्टरी येथे टेस्लाच्या गुंतवणूकदारांना संबोधित करताना एलन मस्क हे बोलत होते. मात्र यावेळी एलन मस्क यांनी नवीन ईलेक्ट्रीक कारची घोषणा केली नाही.
पृथ्वीवर शाश्वत उर्जेचा स्त्रोत :एलन मस्क यांनी बुधवारी टेस्लाच्या गुंतवणूकदारांच्या कार्यक्रमांचे आयोजन केले होते. त्यांनी टेस्लाच्या गुंतवणूकदारांना संबोधित केले. या कार्यक्रमात त्यांनी आपल्या टेस्लाच्या मास्टर प्लॅन ३ बाबतची माहिती उपस्थित गुंतवणूकदारांना दिली. भविष्यात टेस्ला शाश्वात उर्जेसाठी १० ट्रीलियनची गुंतवणूक करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. आपण करत असलेली गुंतवणूक ही जागतिक अर्थव्यवस्थेच्या तुलनेत जास्त नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यासह पृथ्वीवर शाश्वात उर्जेचे स्त्रोत उपलब्ध आहेत. त्यामुळे जीवाश्म इंधनाचा वापर टाळायला हवा असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी उर्जेचा वापर कमी करण्यासाठी नवीन इलेक्ट्रीक कारचे उत्पादनावरही त्यांनी भाष्य केले.
नैसर्गिक अधिवास जोपासणार : पृथ्वीवर शाश्वत उर्जेची अनेक साधने उपलब्ध आहेत. त्यामुळे आपण पारंपरिक उर्जास्त्रोतांवर अवलंबून राहता कामा नये, असे एलन मस्क म्हणाले. यावेळी त्यांनी आपल्याला शाश्वत उर्जास्त्रोत उपलब्ध असल्याने पृथ्वीवरील नैसर्गिक अधिवास नष्ट करण्याची गरज नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यासह त्यांनी आपल्याला थंडीत राहण्याची वा उघड्यावर राहण्याची गरज नसल्याचेही सांगितले. त्यासाठी फक्त आपल्याला नैसर्गिक उर्जेचा वापर करायचा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.