महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Elephant Killed People : वीटभट्टीवर हत्तींचा राडा; उधळलेल्या हत्तीने एकाच कुटूंबातील तिघांना पायदळी चिरडले

लातेहार जिल्ह्यातील चांदवा परिसरातील वीटभट्टीवर हत्तींच्या कळपाने मोठा धुमाकूळ घातला आहे. यावेळी हत्तींच्या कळपाने वीटभट्टीवर काम करणाऱ्या तीन मजुरांना पायदळी चिरडल्याने मोठा संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : May 5, 2023, 11:32 AM IST

लातेहार :जंगली हत्तींनी वीटभट्टीवर जाऊन धुमाकूळ घालत तीन नागरिकांना पायदळी चिरडले आहे. ही घटना लातेहार जिल्ह्यातील चांदवा परिसरातील मल्हाण गावातील विटभट्टीवर ही घटना घडली असून या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट निर्माण झाली आहे. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तिन्ही मृतदेह ताब्यात घेतले आहेत. फानू भुईया त्याची पत्नी बबिता देवी आणि तीन वर्षाच्या चिमुकलीला जंगली हत्तींनी पायदळी तुडवून ठार केले आहे.

जंगली हत्तींचा कळप पोहोचला वीटभट्टीवर :प्रत्यक्षात काल रात्री वीटभट्टीवर काम करणारा मजूर फानू भुईया हा त्याची पत्नी आणि एका लहान मुलीसोबत वीटभट्टीच्या छोट्या झोपडीत झोपला होता. दरम्यान मध्यरात्री हत्तींच्या कळपाने वीटभट्टीवर हल्ला केला. झोपडीत झोपलेल्या फणू भुईया, त्यांची पत्नी बबिता देवी आणि 3 वर्षांच्या मुलीला हत्तींनी पायदळी तुडवले. यादरम्यान वीटभट्टीवर हत्तींनी मोठा अनर्थ घडवला. तेथे काम करणाऱ्या इतर मजुरांनी कसा तरी जीव वाचवून तेथून पळ काढला. मृत तिघेही गढवा जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

कळपात 12 पेक्षा जास्त हत्तींची संख्या : वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजुरांना हत्तीच्या कळपाने चिरडल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला. तब्बल 12 पेक्षा जास्त जंगली हत्तींचा हा कळप रात्री अचानक वीटभट्टीवर आला होता. आम्हाला काही कळायच्या अगोदरच हत्तींनी हल्ला करून तिघांना ठार केले. बाकीचे मजूर कसेतरी जीव वाचवून तिथून निसटले. त्यानंतर हत्ती जंगलाच्या दिशेने निघून गेल्याची माहिती यावेळी मजुरांनी दिली. हत्तींनी चिरडल्याने मजुरांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. मजुरांना हत्तींनी ठार केल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरील मजुरांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत.

वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल :हत्तींच्या कळपाने हल्ला करुन मजुरांना ठार केल्याची माहिती मिळताच वनविभागाचे पथकही घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाच्या जवानांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. हत्तींच्या हल्ल्यात ठार झालेल्या मजुरांच्या नातेवाईकांना वनविभागाकडून योग्य ती भरपाई दिली जाईल, अशी माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. हत्तींना हुसकावून लावण्यासाठी टीम बोलावली जात असल्याचेही वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये संताप :हत्तींनी हल्ला केल्याच्या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या भागात हत्तींची दहशत कायम असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. असे असतानाही विभागाकडून कोणतेही सकारात्मक प्रयत्न केले जात नाहीत. हत्तींची दहशत अशीच सुरू राहिल्यास नागरिकांना गाव सोडून पळून जावे लागेल, असे ग्रामस्थांनी सांगितले.

हेही वाचा - Buddha Purnima : इतरांच्या कल्याणासाठी जीवन समर्पित करा, बुद्ध पोर्णिमेनिमित्त दलाई लामांचा अनुयायांना संदेश

ABOUT THE AUTHOR

...view details