चैन्नई - तामिळनाडुच्या धर्मपूरी जिल्ह्यातील पालाकोडमध्ये तब्बल 50 फूट खोल विहरीमध्ये एक हत्तीन पडल्याची घटना घडली. स्थानिकांनी वनविभागाला याबाबत कळवले असून हत्तीचे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. ही हत्तीन 12 वर्षांची असल्याचा अंदाज वनविभागने वर्तवला आहे. अन्नाच्या शोधात रात्री हत्तीन पंचपल्ली राखीव जंगलाच्या बाहेर आली असेल, असेही वनविभागने म्हटले आहे.
धर्मपुरी जिल्ह्यातील पालाकोड जवळील पंचपल्ली इलाकुंडूर गावात राहणारे व्यंकटाचलम यांना आज पहाटे हत्तीनीच्या गर्जनेचा आवाज ऐकायला आला. तेव्हा आवाजाच्या दिशेने गेले असता, त्यांना 50 फूट खोल विहरीमध्ये हत्तीन पडल्याचे दिसले. याबाबत त्यांनी ताबडतोब पालाकोड वनविभागाला कळवले. तसेच विहरीमध्ये पाणी नसून हत्तीनीला काढण्याचे प्रयत्न वनविभागाकडून सुरू आहेत. विहरीत पडलेल्या हत्तीनीला पाहण्यासाठी गर्दी झाली.