महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 22, 2022, 10:03 PM IST

ETV Bharat / bharat

Punjab Assembly Polls : काँग्रेसने महाविद्यालयीन मुलींना इलेक्ट्रिक स्कूटर देण्याचे दिले आश्वासन

पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी शनिवारी (दि. २२ जानेवारी) घोषणा केली की, इलेक्ट्रिक स्कूटर महाविद्यालयीन मुलींना दिले जातील. या इलेक्ट्रिक स्कूटर लुधियाना येथे उत्पादित केल्या जातील. लुधियानाला इलेक्ट्रिक वाहनाचे हब बनविण्याचा निर्धार असल्याचेही सिद्धू म्हणाले.

सिद्धू
सिद्धू

चंदिगड (पंजाब) -लुधियानामध्ये उत्पादित होणारे इलेक्ट्रिक स्कूटर महाविद्यालयीन मुलींना( Electric Scooters For College Going Girls ) दिल्या जातील, असे आश्वासन पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी शनिवारी (दि. २२ जानेवारी) झालेल्या पत्रकार परिषदेत केले. या इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीसाठी क्लस्टर म्हणून लुधियानाचे विकास केले जाईल, असे ( Punjab Assembly Election 2022 ) ते म्हणाले.

युवा सक्षमीकरण करणार - यावेळी नवज्योत सिद्धू यांनी त्यांच्या 'पंजाब मॉडेल'ची माहिती दिली. पंजाबचे तरुण पुणे, बंगळुरू, गुरुग्राम व परदेशात नोकरीसाठी जात आहेत. आम्ही माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या विचारांप्रमाणे युवा सक्षमीकरण करणार असल्याचे सिद्धू म्हणाले. राज्याच्या अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित करण्यासाठी पंजाब मॉडेल अंतर्गत, लुधियाना हे औद्योगिक क्लस्टर्सपैकी एक असेल तर मोहाली हे शहर आयटी हब करण्याचा आमचा मानस आहे, असेही सिद्धू म्हणाले. तसेच पटियाला येथे दागिन्यांचा क्लस्टर उभारला जाणार असून मंडी गोबिंदगड येथे पोलाद कारखान्यासोबतच ऑटोमोबाईल उद्योगही सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. अमृतसरला वैद्यकीय आणि धार्मिक पर्यटन केंद्र म्हणून, मलौत आणि मुक्तसरला कापड आणि कृषी उपकरणे क्लस्टरच्या रूपात विकसित केली जातील. यामुळे पंजाबमधील युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल, असेही सिद्धू यांनीि पत्रकार परिषदेत सांगितले.

दोन दिवसांत ३१ जणांच्या नावाची यादी होणार जाहीर - ते पुढे म्हणाले की, वाळू उत्खननावर इतरांकडे बोट दाखवताना बिक्रम मजिठा यांनी 10 वर्षांच्या अकाली राजवटीचे आत्मपरीक्षण करावे. "अमली पदार्थांच्या तस्करीचा आरोप असलेल्या व्यक्तीने इतरांकडे बोट दाखवू नये, असेही सिद्धू म्हणाले. यावेळी त्यांना पक्षातील बंडखोरीबाबत विचारणा केली असता ते म्हणाले, मी कॅप्टन अमरिंद सिंग यांच्या प्रमाणे विरोध करणाऱ्यांवर कारवाई करणार नाही. येत्या दोन दिवसांत ३१ जणांच्या नावाची यादी जाहीर करणार, असेही नवज्योजतसिंग सिद्धू यांनी पत्रकार परिषदेत म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details