पाटणा -बिहार विधानसभा अध्यक्षपदासाठी मतदान पार पडले. महागठबंधनच्या बाजूने अवध बिहारी चौधरी तर एनडीएच्या बाजूने माजी मंत्री आणि लखीसराय येथील आमदार विजय सिन्हा मैदानात होते. विजय सिन्हा यांचा विजय झाला असून त्यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली आहे. याची घोषणा जीतन राम मांझी यांनी केली. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक एनडीएच्या दृष्टीने प्रतिष्ठेची होती.
महागठबंधनचे उमेदवार अवध बिहारी चौधरी विजय सिन्हा यांच्या बाजूने 126 आणि विरोधामध्ये 114 मते पडली. मुख्यमंत्री नितीश कुमार, मंत्री अशोक चौधरी, मंत्री मुकेश सहनी हे विधानसभा अध्यक्ष निवड प्रक्रियेदरम्यान उपस्थित होते. त्यामळे राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्यांनी मोठा गोंधळ घातला. गोंधळामुळे 5 मिनिटांसाठी सभा स्थगितही करावी लागली. त्यानंतर पुन्हा कार्यवाही सुरू करण्यात आली.
बिहार विधानसभेच्या अध्यक्षपदी एनडीएच्या विजय सिन्हा यांची निवड लालूंवर आमदार फोडण्याचा आरोप -
बिहार विधानसभा अध्यक्षपदासाठी होत असलेल्या निवडणुकीमध्ये महागठबंधनच्या बाजूने मतदान करण्यासाठी, लालूप्रसाद यादव यांनी एनडीएच्या आमदारांना फोन करून त्यांना मंत्रीपदाचे आमीष दाखवले, असा आरोप माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी केला आहे. सुशील मोदी यांनी एक ऑडिओही जारी केला आहे. ज्यामध्ये लालूप्रसाद यादव एनडीएच्या आमदारांना मंत्रीपदाचे आश्वानस देत असून कोरोनाचं कारण देत अनुपस्थित राहण्यासाठी सांगत आहेत.
गोंधळामुळे 5 मिनिटांसाठी सभा स्थगित एनडीएला बहुमत -
बिहार विधानसभा निवडणुकीचा 10 नोव्हेंबरला निकाल समोर आला. 243 मतदारसंघासाठी झालेल्या या निवडणुकीत एनडीएला काठावरचे बहुमत मिळाले आहे. तर राष्ट्रीय जनता दल सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) 125 जागा मिळाल्या आहेत. तर महागठबंधनला 110 जागांवर समाधान मानावे लागले. एनडीएत भाजपाला 74 जागा मिळाल्या आहेत. तर जनता दल (यू) 43, हिंदुस्तान आवाम मोर्चा (सेक्युलर) आणि विकासशील इन्सान पार्टीने प्रत्येकी 4 जागांवर विजय मिळवला आहे.