महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Todays Top News in Marathi : विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होणार, जाणून घ्या आजच्या टॉप बातम्या - बेस्ट अर्थसंकल्प चर्चा

राष्ट्रीय निवडणुक आयोग आणि आरोग्य मंत्रालयाची ( Election commission meeting with Health Ministry ) सकाळी ११ वाजता बैठक होणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निवडणुक आयोग आरोग्य मंत्रालयाच्या अधिकार्‍यांकडून ओमिक्रॉनबद्दल सर्व माहिती जाणून घेणार आहे. दिल्लीत २७ डिसेंबर म्हणजे उद्या रात्रीपासून नाइट कर्फ्यू लागू करण्याचा ( Night Curfew in New Delhi ) निर्णय घेण्यात आला आहे. जाणून घ्या, अशा महत्त्वाच्या घडामोडी.

Todays Top  News in Marath
Todays Top News in Marath

By

Published : Dec 27, 2021, 4:40 AM IST

Updated : Dec 27, 2021, 6:12 AM IST

  1. मुंबई - राज्यात कोरोना आणि ओमायक्रॉन रुग्ण संख्येत चढ उतार होताना दिसून येत आहेत. दिवसभरात कोरोनाचे 1648 तर, ओमायक्रॉन 31 नवे रुग्ण आढळून (Maharashtra omicron update ) आले आहेत. ओमायक्रॉनचे सर्वाधिक 27 रुग्ण मुंबईत तर, उर्वरित 4 रुग्ण इतर भागात सापडले आहेत. यामुळे राज्यात ओमायक्रॉनची रुग्ण संख्या 141 झाली आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली. सविस्तर वाचा-
  2. सिंधुदुर्ग- सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक ( Sindhudurg DCC Bank Election ) प्रचारात 18 डिसेंबर रोजी कणकवलीत शिवसैनिक संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला करणारा मुख्य संशयीत आरोपी सचिन सातपुते यास गजाआड करण्यात आले आहे. सातपुते याला सिंधुदुर्ग पोलिसांनी दिल्लीमधून मोठ्या शिताफीने अटक केल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, या प्रकरणात ( Santosh Parab Case ) आपल्याला अडकवले जात असल्याचा आरोप आमदार नितेश राणे यांनी केला आहे.सविस्तर वाचा-
  3. सिंधुदुर्ग - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावेळी ( Ajit Pawar In Sindhudurg ) त्यांच्या गाडीचे सारथ्य तृप्ती मुळीक ( LPC Trupti Mulik ) या सिंधुदुर्ग पोलिस दलातील महिला चालकाने ( Ladies Driver For Ministers Vehicle ) केल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. आपण नेहमी मंत्री, नेत्यांच्या गाडीला पुरुष चालक असल्याचे पाहत असतो. मात्र अजित पवारांच्या गाडीचे सारथ्य ( Ajit Pawar Car Driven By LPC ) करण्याची संधी ही महिला पोलीस कर्मचाऱ्याला देण्यात आली. या महिला पोलिसानेही सफाईदारपणे गाडी चालवत आम्ही महिला पण याबाबतीत कुठेही मागे नाही, हेच दाखवून दिले. सविस्तर वाचा-
  4. रायपूर - धर्म संसदेत (Raipur Dharma Sansad 2021) रविवारी मोठा वाद निर्माण झाला. महाराष्ट्रातून आलेले संत कालीचरण यांनी व्यासपीठावरून बोलताना महात्मा गांधी (Father of the Nation Mahatma Gandhi) यांच्याबद्दल वादग्रस्त (controversial statement on Mahatma Gandhi in Dharmasansad) विधान केले. १९४७ मध्ये झालेल्या भारताच्या फाळणीला त्यांनी महात्मा गांधी जबाबदार असल्याचे म्हटले. सविस्तर वाचा-
  5. नाशिक -शहरातील सिम्बॉयसिस कॉलेजच्या शेजारी असलेल्या हॉटेल एक्सलनसी इनच्या आवारात नुतनीकरणाचे काम सुरू असताना ( youth death in Nashiks hotel ) दुर्घटना घडली आहे. हॉटेलमध्ये खोली बघायला गेलेल्या तरुणाचा पहिल्या मजल्यावरून पडून ( youth fallen from first floor ) मृत्यू झाला आहे. हा सर्व प्रकार हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ( CCTV catches youth death ) कैद झाला आहे. सविस्तर वाचा-

या घडामोडीवर असणार नजर

  1. मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये बेस्टचा 2200 कोटी तुटीचा अर्थसंकल्प ( BEST Budget 2021 ) सादर करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पावर स्थायी समिती सदस्य आज चर्चा आणि सूचना करणार आहेत.
  2. येत्या 27 डिसेंबरला विधानसभा अध्यक्षांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर ( Speaker of Assembly election ) करण्यात येणार आहे. 28 डिसेंबरला मतदान होणार असल्याची माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे. मात्र, या निवडीवर भाजपने आक्षेप घेतला आहे.
  3. मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षान्त समारंभ विद्यापीठाच्या फोर्ट येथील सर कावसजी जहांगीर दीक्षान्त सभागृहात २७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. या दीक्षान्त समारंभाचे थेट प्रक्षेपण मुंबई विद्यापीठाच्याwww.mu.ac.in या संकेतस्थळावरून होणार आहे. गेल्या १० डिसेंबरला होणारा दीक्षान्त समारंभ पुढे ढकलण्यात आला होता.
  4. राष्ट्रीय निवडणुक आयोग आणि आरोग्य मंत्रालयाची सकाळी ११ वाजता बैठक होणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निवडणूक आयोग आरोग्य मंत्रालयाच्या अधिकार्‍यांकडून ओमिक्रॉनबद्दल सर्व माहिती जाणून घेणार आहे.
  5. दिल्लीत २७ डिसेंबरपासूननाइट कर्फ्यू लागू करण्याचा ( Night Curfew in New Delhi ) निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने जुलैमध्ये GRAP ला मान्यता दिली होती.

जाणून घ्या, आज कसा असेल दिवस-

Last Updated : Dec 27, 2021, 6:12 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details