महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Karnataka Election 2023 : 'इलेक्शन किंग' पद्मराजनचे आता बोम्मईं विरोधात नामांकन! या दिग्गजांविरोधातही लढवली आहे निवडणूक - बसवराज बोम्मई यांच्या विरोधात उमेदवारी

इलेक्शन किंग म्हणून प्रसिद्ध असलेले 64 वर्षीय पद्मराजन यांनी आता कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी आतापर्यंत अटल बिहारी वाजपेयी, नरसिंह राव, जयललिता, करुणानिधी, एके अँटोनी, येडियुरप्पा, एमके स्टॅलिन अशा दिग्गजांविरोधात निवडणूक लढवली आहे.

K Padmarajan
के. पद्मराजन

By

Published : Apr 15, 2023, 9:15 PM IST

हावेरी (कर्नाटक) : 'इलेक्शन किंग' म्हणून ओळखले जाणारे के. पद्मराजन यांनी शुक्रवारी कर्नाटकच्या शिगवी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मूळचे तामुळनाडूचे असलेले पद्मराजन यांचे हे 233 वे नामांकन आहे.

बहुतांश निवडणुकीत केवळ अर्ज दाखल केला : याबाबत हावेरीचे जिल्हाधिकारी रघुनंदना मूर्ती म्हणाले, 'उमेदवारी अर्ज भरणे आणि उमेदवार होणे यात खूप फरक आहे. पद्मराजन यांनी बहुतांश निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केले असतील, मात्र ते उमेदवार नव्हते. ते स्वत: मतदार असलेल्या मतदारसंघातच निवडणूक लढवू शकतात. तसेच त्यासाठी त्यांना 10 स्थानिक लोकांचे प्रस्ताव आवश्यक आहेत. मात्र पद्मराजन यांच्यासाठी कोणीही प्रस्ताव सादर केलेला नाही. त्यामुळे त्यांचा अर्ज फेटाळला जाऊ शकतो.' कर्नाटकच्या 224 विधानसभा जागांसाठी 10 मे 2023 रोजी मतदान होणार आहे.

'ऑल इंडिया इलेक्शन किंग' ही उपाधी मिळाली आहे : इलेक्शन किंग म्हणून प्रसिद्ध असलेले 64 वर्षीय पद्मराजन हे तामिळनाडूच्या सालेम जिल्ह्यातील मेत्तूरचे आहेत. ते पेशाने होमिओपॅथिक डॉक्टर असून त्यांनी देशभरात अनेक निवडणुका लढवल्या आहेत. पद्मराजन यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्यासाठीही उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पद्मराजन यांना इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स तसेच लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये स्थान मिळाले आहे. त्यामुळेच त्यांना 'ऑल इंडिया इलेक्शन किंग' ही पदवी मिळाली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान पद्मराजन यांनी केरळमधील वायनाड येथून राहुल गांधींविरोधात निवडणूक लढवली होती. तेव्हा पद्मराजन यांनी कोणत्याही प्रचाराशिवाय 1,850 मते मिळवली होती.

अनेक दिग्गजांविरोधात निवडणूक लढवली : पद्मराज यांनी आतापर्यंत अटल बिहारी वाजपेयी, नरसिंह राव, जयललिता, करुणानिधी, एके अँटोनी, येडियुरप्पा, बंगारप्पा, एसएम कृष्णा, एडप्पाडी पलानीसामी, एमके स्टॅलिन अशा दिग्गजांविरोधात निवडणूक लढवली आहे. त्यांनी 5 राष्ट्रपती, 5 उपराष्ट्रपती, 32 लोकसभा, 50 राज्यसभा, 72 विधानसभा निवडणुका, 3 MLC, 1 महापौर, 3 चेअरमॅन, 4 पंचायत अध्यक्ष, 12 नगरसेवक, 2 जिल्हा परिषद, 3 केंद्रीय नगरसेवक, 6 प्रभाग सदस्य व 30 संचालक पदासाठीच्या निवडणुका लढवल्या आहे.

हेही वाचा :Pulwama Attack : पुलवामा हल्ला, सर्वात स्फोटक मुलाखत 'ईटीव्ही भारत'वर; सत्यपाल मलिक म्हणाले, 'मोदींनी त्यावेळी..'

ABOUT THE AUTHOR

...view details