पणजी - गोवेकारासाठी गोव्याच्या संस्कृतीचे दर्शन मतदान केंद्रावर घडविण्यासाठी निवडणूक आयोगाने चक्क ग्रीन पोलिंग स्टेशनची निर्मिती केली आहे. सोबतच खास महिलांसाठी पिंक पोलिंग स्टेशन उभारण्यात आला आहे. महिलांसाठी खास 105 पिंक पोलिंग स्टेशनची निर्मिती आयोगाने केली आहे.
गोवा म्हणजे हिरवागार निसर्ग, निळाशार समुद्र आणि यात वसलेली लोकवस्ती आणि संस्कृती. अर्थातच गोवेकारांच्या या संस्कृतीचे दर्शन गोवेकराना घडविण्यासाठी निवडणूक आयोगाने राज्यात 11 ठिकाणी अशा ग्रीन पोलिंग स्टेशनची निर्मिती केली आहे. यात पोलिंग स्टेशनवर मतदार आल्यानंतर खास त्यांच्यासाठी ग्रीन कार्पेट लावण्यात आला आहे. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर मतदानाच्या ठिकाणी सर्वच साधने ही पारंपरिक पद्धतीने सजवण्यात आली आहेत. यात शाईच्या पेनपासून बसायची खुर्चीदेखील गोवन पद्धतीने सजवण्यात आली आहे. त्यातच गुप्त पद्धतीने करावयाचे मतदान यंत्रभोवतीचे आच्छादन देखील बाबूंच्या जाळीपासून बनविण्यात आले आहे.
खास सेल्फी स्टँड
मतदार मतदान करून बाहेर आल्यावर सेल्फी घेण्याची प्रत्येकाची हौस असते. याचसाठी निवडणूक आयोगाने खास माडाच्या झावळ्या विणून सेल्फी पॉईंट बनविला आहे.
महिलांसाठी पिंक पोलिंग बूथ