हैदराबाद - भारतीय निवडणूक आयोग 5 राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा ( Assembly Election 2022 ) आज जाहीर करत आहे. उत्तर प्रदेश व्यतिरिक्त पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. भारतीय निवडणूक आयोग आज तारखा जाहीर केल्या. यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.
- पाच राज्यातील ६९० मतदारसंघात निवडणुका -
६९० मतदारसंघात निवडणुका होतील. यापैकी गोव्यातले ४०, मणिपूरमधील ६०, पंजाबमधील १७०, उत्तराखंडमधील ७० आणि उत्तर प्रदेशमधील ४०३ निवडणुकांचा समावेश आहे.
- 8.55 कोटी महिला मतदार -
पाच राज्यातील एकूण 18.34 कोटी मतदार या निवडणुकीत भाग घेतील, त्यापैकी 8.55 कोटी महिला मतदार आहेत अशी माहिती सीईसी सुशील चंद्रा यांनी दिली आहे. यामध्ये सर्वाधिक २९ टक्के उत्तर प्रदेशात, गोव्यात २४ टक्के, मणिपूरमध्ये १९ टक्के, उत्तराखंड १८ टक्के तर पंजाबमध्ये १० टक्के महिला मतदारांचं प्रमाण वाढलं आहे. २४.९ लाख मतदार पहिल्यांदा मतदान करणार आहेत. त्यामध्ये ११.४ लाख महिला मतदार आहेत.
- प्रत्येक मतदार संघात एक मतदान केंद्र महिला व्यवस्थापित करणार -
प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किमान एक मतदान केंद्र महिला व्यवस्थापित करणार आहेत. विधानसभेच्या 690 जागावर निवडणूक होणार आहे. पण महिला व्यवस्थापित करणारी 1620 मतदान केंद्रे उभारत येणार आहोत.
- ज्येष्ठ, कोरोना रुग्णासाठी पोस्टल मतपत्रिकेद्वारे मतदान -
80 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती आणि कोविड-19 रूग्ण पोस्टल मतपत्रिकेद्वारे मतदान करू शकतात अशी माहिती त्यांनी दिली आहे.
- मतदान केंद्रांवर EVM आणि VVPAT चा वापर -
सर्व मतदान केंद्रांवर EVM आणि VVPAT चा वापर केला जाईल. निवडणूक सुरळीत पार पडावी यासाठी निवडणूक आयोगाने आधीच पुरेशा प्रमाणात ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटीची व्यवस्था केली आहे असे सीईसी सुशील चंद्रा यांनी सांगितले.
- आदर्श आचारसंहिता उल्लंघन केल्यास कठोरपणे कारवाई -