नवी दिल्ली : उत्तर प्रदेशसह पाच राज्याच्या निवडणूकिचा कार्यक्रम जाहिर झालेला आहे. निवडणूक आयोगाने राजकीय रॅली आणि रोड शो वरील बंदी 22 जानेवारी 2022 पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतल आहे. याआधी निवडणूक आयोगाने पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून 15 जानेवारीपर्यंत रॅली आणि रोड शोवर बंदी घातली होती.
निवडणूक आयोगाची 22 जानेवारीपर्यंत निवडणूक रॅली आणि रोड शोवर बंदी - पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका
निवडणूक आयोगाने (Election Commission ) राजकीय रॅली आणि रोड शो ( poll rallies & roadshows) वरील बंदी 22 जानेवारी 2022 पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतल आहे. याआधी निवडणूक आयोगाने पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका (Five state assembly election) जाहीर झाल्यापासून 15 जानेवारीपर्यंत रॅली आणि रोड शोवर बंदी घातली होती.
लहान आणि सभागृहात होणाऱ्या सभांबाबत दिलेल्या निर्देशा प्रमाणे सभागृहाच्या आसन क्षमतेपैकी 50 टक्क्यांपर्यंत किंवा तेथे 300 जणांच्या उपस्थितीत सभा घेण्यास परवानगी दिली आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना सूचना दिल्या आहेत की, या बैठकीदरम्यान कोविड प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. तसेच 8 जानेवारी 2022 रोजी जारी करण्यात आलेल्या निवडणुकांबाबत सर्वसमावेशक 16 कलमी मार्गदर्शक तत्त्वेही पूर्वीप्रमाणेच लागू राहणार आहेत, असेही आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.