रामेश्वरम (तामिळनाडू) - माजी राष्ट्रपती, दिवंगत एपीजे अब्दुल कलाम यांचे थोरले बंधू मोहम्मद मुथू मीरा मराईकर यांचे रविवारी निधन झाले. ते 104 वर्षाचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते वयाशी आणि आरोग्याच्या स्थितीशी संबंधित आजारांनी ग्रस्त होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे.
मराईकर यांनी 2016 मध्ये वयाची शंभर वर्ष पार केली होती. तेव्हापासून दरवर्षी त्यांचा वाढदिवस रामेश्वरममध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हजारो हितचिंतक त्यांच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या घरी भेट देतात.