हैदराबाद - एकनाथ शिंदे यांचे बंड यशस्वी होण्यासाठी त्यांना 37 शिवसेना आमदारांची गरज आहे. सूरतमधून माध्यमांना मिळालेल्या फोटोमध्ये त्यांच्याबरोबर 34 आमदार असल्याचे दिसत आहे. त्यातील 32 आमदार शिवसेनेचे आहेत. त्याचे इतरही काही फोटोही व्हायरल होत आहेत. त्यातील एका फोटोमध्ये राज्यातील 34 आमदार असल्याचे दिसत आहे. त्यामध्ये शिवसेनेचे एकूण 32 आमदार आहेत. तर इतर पक्षांचे 2 आमदार आहेत. यावरुन एक गोष्ट लक्षात येते की शिवसेनेचे 32 आमदार शिंदे यांच्याबरोबर असल्याचे दिसते.
सूरतच्या फोटोचे गणित - सूरतच्या फोटोच्या आधारावरुन महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार केला तर शिंदे यांच्यापाठीशी असलेले संख्याबळ पाहता राज्यसरकार संकटात असल्याचे दिसत आहे. या फोटोनुसार शिंदे यांच्याजवळ असलेल्या आमदारांच्यावरुन दिसते की नवीन सरकार बनवण्यासाठी सध्या तरी बहुमत आहे. मात्र शिवसेनेचे त्या फोटोमध्ये फक्त 32 आमदार दिसत आहेत. त्यामुळे आमदारांना जर पक्षांतर बंदी कायद्यातून सही सलामत बाहेर पडायचे असतील तर त्यांना अजून 5 शिवसेना आमदारांची गरज आहे. शिंदे यांच्या गोटातून त्यांच्याकडे 40 आमदार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र फोटोचा विचार केला तर त्यामध्ये फक्त 32 शिवसेना आमदार दिसत आहेत. त्यामुळे त्यांच्या म्हणण्यानुसार इतर 8 शिवसेना आमदार कोण हा प्रश्नही महत्वाचा आहे.
शिंदे गोटातून आलेल्या या फोटोनुसार शिवसेनेचे 32 आमदार त्यामध्ये आहेत. तर इतर पक्षाचे 2 आमदार आहेत. खाली बसलेले डावीकडून तिसरे शंभूराज देसाई, चौथे अरुण बाबर, पाचवे तानाजी सावंत, सहावे संदीपान भुमरे, सातवे बच्चू कडू, आठवे शशिकांत शिंदे, दहावे प्रदीप जयस्वाल, अकरावे भरत गोगावले, बारावे बालाजी किनीकर, तेरावे संजय गायकवाड, चौदावे प्रताप सरनाईक, पाठीमागे डावीकडून उभे पहिले राजेंद्र यड्रावकर यांचे भाऊ, तिसरे रमेश बोरनारे, पाचवे यामिनी जाधव, सहावे लता सोनवणे, सातवे संजय शिरसाट, अकरावे व्हीक्ट्री साईन केलेले प्रकाश आबिटकर, तेरावे श्रीनिवास वनगा, चौदावे प्रकाश सुर्वे, सोळावे महेंद्र थोरवे, तसेच अपक्ष आमदार नरेंद्र बोंडेकरही त्यामध्ये आहेत.
संपूर्ण आमदारांची यादी - यातील संपूर्ण 34 आमदारांची नावे पुढील प्रमाणे शंभूराजे देसाई , अब्दुल सत्तार, बच्चू कडू, संदिपान भुमरे, प्रताप सरनाईक, सुहास कांदे, तानाजी सावंत, भरत गोगावले, यामिनी जाधव, अनिल बाबर, प्रकाश सुर्वे, बालाजी कल्याणकर, प्रकाश आबिटकर, संजय शिरसाट, श्रीनिवास वनगा, महेश शिंदे, संजय रायमुलकर, विश्वनाथ भोईर, सिताराम मोरे, रमेश बोरणारे, चिमणराव पाटील, लहुजी बापू पाटील, महेंद्र दळवी, प्रदीप जैस्वाल, महेंद्र थोरवे, किशोर पाटील, ज्ञानराज चौगुले, बालाजी किणेकर, उदयसिंह राजपूत, राजकुमार पटेल, लता सोनवणे, नितीन देशमुख, संजय गायकवाड, नरेंद्र मांडेकर. यांची संख्या पाहता भाजप पुरस्कृत सरकार स्थापन्यासाठी पुरेसे संख्याबळ असल्याचे दिसून येते.