महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Congress MLAs Joined BJP : गोव्यात मायकल लोबोसह काँग्रेसच्या आठ आमदारांचा भाजपात प्रवेश - मायकल लोबो

( Congress MLAs Joined BJP ) गोव्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या 11 पैकी 8 आमदारांनी आज भाजपमध्ये प्रवेश ( 8 Congress MLA joined BJP ) केला. पक्षात येण्यापूर्वी या बंडखोर काँग्रेस आमदारांनी ( Congress rebel MLA in Goa ) गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत ( Chief Minister Pramod Sawant ) यांचीही भेट घेतली.

Congress MLAs Joined BJP
Congress MLAs Joined BJP

By

Published : Sep 14, 2022, 12:43 PM IST

Updated : Sep 14, 2022, 1:42 PM IST

पणजी -( Congress MLAs Joined BJP )गोव्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या 11 पैकी 8 आमदारांनी आज भाजपमध्ये प्रवेश ( 8 Congress MLA joined BJP ) केला. पक्षात येण्यापूर्वी या बंडखोर काँग्रेस आमदारांनी ( Congress rebel MLA in Goa ) गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत ( Chief Minister Pramod Sawant ) यांचीही भेट घेतली. भाजपमध्ये सामील झालेल्या आमदारांमध्ये माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, ( Former Chief Minister Digambar Kamat ) मायकल लोबो, ( Michael Lobo join BJP ) डेलिला लोबो, राजेश फळदेसाई, केदार नाईक, संकल्प आमोणकर, अलेक्सो सिक्वेरा आणि रुडॉल्फ फर्नांडिस यांचा समावेश आहे. यापूर्वी भाजपचे गोवा प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनीही आज काँग्रेसचे 8 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा केला होता.

काँग्रेसच्या भारत जोडो दरम्यान धक्का -काँग्रेसच्या भारत जोडो दरम्यान धक्का गोव्यातील काँग्रेस आमदारांनी बंडखोरी करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. एकीकडे काँग्रेस राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात भारत जोडो यात्रा काढत आहे. ही यात्रा 150 दिवसांची असणार आहे. तसेच 3 हजार 570 किमीचा प्रवास प्रवास करून 12 राज्यांमधून भारत जोडो यात्रा जाणार आहे.

गोव्यात मायकल लोबोसह काँग्रेसच्या आठ आमदारांचा भाजपात प्रवेश

गोव्यात काँग्रेसचे 11 आमदार -या वर्षी फेब्रुवारीमध्ये गोव्यात 40 जागांसाठी विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. यापैकी भाजप आघाडीचे (एनडीए) 25 आमदार निवडूण आले आहेत. त्यापैकी काँग्रेसचे 11 आमदार होते. आता यातील 8 जण भाजपमध्ये दाखल झाले आहेत.

दुसऱ्यांदा काँग्रेसमध्ये फूट -गोव्यात मार्चमध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर दुसऱ्यांदा काँग्रेसमध्ये फूट पडल्याची चर्चा होती. याआधी जुलैमध्ये काँग्रेसच्या ११ पैकी ५ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याची चर्चा होती. मात्र, काँग्रेसने योग्य वेळी सक्रियता दाखवून हे बंड थांबवले होते. त्यावेळी काँग्रेसचे आमदार दिगंबर कामत, मायकल लोबो, राजेश फळदेसाई, केदार नाईक, दलीला लोबो हे बंडखोर असल्याची चर्चा होती. मात्र, काँग्रेसने मायकेल लोबो यांना पक्षविरोधी कारवायांमध्ये गुंतल्यामुळे विरोधी पक्षनेतेपदावरून हटवले होते.

2019 मध्येही फुट -गोव्यात काँग्रेसला धक्का बसण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी गोव्यातील गेल्या विधानसभा निवडणुकीत म्हणजेच 2017 मध्ये काँग्रेसला 17 जागा मिळाल्या होत्या. मात्र 13 जागा असूनही भाजपला सरकार स्थापन करण्यात यश आले होते. 2019 मध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला होता. त्यावेळी काँग्रेसचे 10 आमदार भाजपमध्ये सामील झाले. यानंतर आणखी 2 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

Last Updated : Sep 14, 2022, 1:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details