महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Eight Maoists Arrested In Chhattisgarh : विजापूर येथे जाळपोळ करणाऱ्या माओवाद्यांना अटक - विजापूर येथे माओवाद्यांना अटक

छत्तीसगडमधील विजापूर जिल्ह्यात २ फेब्रुवारी रोजी दोन ट्रक जाळण्यात सहभागी असलेल्या आठ माओवाद्यांना अटक करण्यात आली आहे. ( Eight Maoists Arrested In Chhattisgarh ) जाळपोळीची ही घटना मंगपेंटा आणि बरगापारा दरम्यान घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुटरु पोलीस स्टेशनच्या हद्दीतील इरामंगी गावातून रविवारी संध्याकाळी अटक करण्यात आली.

विजापूर येथे जाळपोळ करणाऱ्या माओवाद्यांना अटक
विजापूर येथे जाळपोळ करणाऱ्या माओवाद्यांना अटक

By

Published : Apr 19, 2022, 11:21 AM IST

विजापूर (छत्तीसगड) - छत्तीसगडमधील विजापूर जिल्ह्यात २ फेब्रुवारी रोजी दोन ट्रक जाळण्यात सहभागी असलेल्या आठ माओवाद्यांना अटक करण्यात आली आहे. जाळपोळीची ही घटना मंगपेंटा आणि बरगापारा दरम्यान घडली आहे. ( Eight Maoists arrested in Bijapur ) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुटरु पोलीस स्टेशनच्या हद्दीतील इरामंगी गावातून रविवारी संध्याकाळी अटक करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्यांची नावे

  • हुंगा कावासी (४५)
  • वामन पोयाम (४२)
  • सुखराम पोयामी (३६)
  • फग्नू मडवी (१८)
  • सीतो राम मडवी (२६)
  • तुलसी राम मडवी (२६)
  • बद्रू मडवी आणि चंद्रू कुहरामी (५२)

हे सर्व मूळचे इरामांगी येथील आहेत.

अटक करण्यात आलेले सर्व नक्षलवादी इरामंगी येथील रहिवासी आहेत. (4 फेब्रुवारी 2022)रोजी सर्व नक्षलवाद्यांनी मंगपेंटा आणि बरगापारा दरम्यान जाळपोळ करण्याची घटना घडवली. कुरूटु पोलीस ठाण्यात कारवाईनंतर नक्षलवाद्यांना दंतेवाडा न्यायालयात हजर करण्यात आले. अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांचे नातेवाईक पोलीस ठाणे गाठले होते. पोलिसांनी सर्व नक्षलवाद्यांना जबरदस्तीने उचलून नेल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान, आपण नक्षलवादी नसल्याचा दावा त्यांना केला आहे.

अशा विकासकामांपासून दूर राहण्याचा इशारा - रविवारी रात्री विजापूर-दंतेवाडा सीमेवर माओवाद्यांनी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत बांधकामात गुंतलेले चार ट्रॅक्टर पेटवून दिले, असे पोलिसांनी सांगितले. "मंगनार गावाजवळील जागेवर सुमारे 15 वाहने आणि यंत्रसामग्री उभी होती. त्यांनी चार ट्रॅक्टर जाळले आणि कामगार आणि पंचायत प्रतिनिधींना अशा विकासकामांपासून दूर राहण्याचा इशारा दिला.

ते माओवादी नाहीत - पोलिसांनी अटक केलेल्या माओवाद्यांना दंतेवाडा न्यायालयात हजर करण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या माओवाद्यांच्या नातेवाईकांनी पोलीस स्टेशन गाठले आणि पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांना जबरदस्तीने उचलून नेल्याचा आरोप केला आहे. ते माओवादी नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, पोलिसांनी त्यांची सुटका करावी अशी मागणीही केली आहे.

हेही वाचा -Russia-Ukraine War : रक्तरंजित संघर्ष! रशिया-युक्रेन युध्द अधिक तीव्र; लिव्हमध्ये 7 ठार

ABOUT THE AUTHOR

...view details