लखनऊ :उत्तर प्रदेश पोलिसांनी शनिवारी एका रुग्णालयाच्या आठ कर्मचाऱ्यांना अटक केली. सुभर्ती वैद्यकीय महाविद्यालयातील या कर्मचाऱ्यांवर रेमडेसिवीर इंजेक्शन बाहेर विकल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या कर्मचाऱ्यांनी कोरोना रुग्णासाठी आणलेले रेमडेसिवीर विकून, रुग्णाला चक्क सलाईन वॉटर दिले होते. यातच एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या कर्मचाऱ्यांनी हे इंजेक्शन २५ हजार रुपयांना बाहेर विकले होते. याप्रकरणी दहा लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये महाविद्यालयाचे ट्रस्टी अतुल भटनागर आणि त्यांच्या मुलाचाही समावेश आहे.