बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार पाटणा येथील गांधी मैदानावर ईद निमित्त नमाजला उपस्थित होते. ते म्हणाले, "2 वर्षांपासून, कोविडमुळे लोक येथे येऊ शकले नाहीत. आनंद आहे की पुन्हा ईदच्या दिवशी मोठ्या संख्येने लोक येथे आले आहेत. बिहार आणि देश पुढे जावो आणि बंधुभाव कायम राहो."
Live Updates : देशभरात ईदचा उत्साह, जामा मशिदीत सामुहिक नमाज पठन
12:46 May 03
मुख्यमंत्री नितीश कुमार नमाज पठनासाठी उपस्थिती
11:06 May 03
कोईम्बतूरमधील इस्लामिया मॅट्रिक्युलेशन हायर सेकेंडरी स्कूलमध्ये नमाज
तामिळनाडू राज्यातील कोईम्बतूरमधील इस्लामिया मॅट्रिक्युलेशन हायर सेकेंडरी स्कूलमध्ये नमाज अदा करताना... मोठ्या संख्येने मुस्लीम बांधवांची गर्दी होती.
10:20 May 03
शरद पवारांनी दिल्या शुभेच्छा
सर्व मुस्लिम बंधु-भगिनींना रमज़ान ईदच्या हार्दिक शुभेच्छा! बंधुभाव, एकता व सलोख्याचा संदेश सर्वदूर पोहचवण्याचा संकल्प रमज़ान ईद निमित्त करूया. ईद मुबारक!, अशा शुभेच्छा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी दिल्या.
10:17 May 03
मुख्यमंत्री ममता बँनर्जी यांचे संबोधन
ईदनिमित्त मुख्यमंत्री ममता बँनर्जी यांनी कलकत्यातील रेड रोडमध्ये नागरिकांना संबोधित केले. त्या म्हणाल्या, आपल्याला घाबरण्याची गरज नाही. कसं लढायचं आपल्याला माहिती. त्यामुळे चांगले दिवस लवकर येतील.
09:38 May 03
नागपुरात कडक बंदोबस्त
नागपूर - मशिदींवरील भोंगे आणि त्यांचा आवाज या विषयावरून सध्या राज्याचं राजकारण चांगलचं तापलेले आहे. एकीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) भोंग्यांच्या विरोधात तीव्र आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे ईदच्या पार्श्वभूमीवर नागपुरातील मुस्लिम बहुल संवेदनशील ठिकाणांवर पोलिसांचा वॉच ठेवला आहे. ईद उत्साहात आणि शांततेत पार पडावी यासाठी पोलीस सज्ज झाले आहेत. केवळ शहरचं नाही तर ग्रामीण भागातही पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. नागपूर शहरात 283 तर जिल्ह्यात 108 मस्जिद आहेत. ईदच्या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क असून साडे तीन हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये राज्य राखीव दल,होमगार्डसह सुमारे साडे तीन हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
09:36 May 03
राजकिय नेत्यांकडून नमाज पठन
भाजपा नेते शाहनवाज हुसैन स्ट्रीट मशिदीत नमाज पठन केले. तर काँग्रेसचे जेष्ठ नेते गुलाब नबी आझाद यांनी देखील दिल्लीतील स्ट्रीट मशीदीत नमाज पठन केले. कोरोनानंतर ही मोकळीक मिळत असल्याचे प्रतिपाद आझाद यांनी यावेळी केले.
08:28 May 03
केरळच्या राज्यपालांचे नमाज पठन
केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी तिरूअनंतपुरम येथील चंद्रशेखरन स्टेडियमवर नमाज पठन केले.
08:26 May 03
जितेंद्र आव्हाडांनी दिल्या शुभेच्छा
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या. सर्वांच्या इच्छा अल्लाह पूर्ण करो, अशी प्रार्थना देखील त्यांनी केली.
07:32 May 03
माहिम दर्गात नमाज पठन
मुंबईतील माहीम मशिदीत सकाळी नमाज पठन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने मुस्लीम बांधव एकत्र झाले होते.
07:29 May 03
जामा मशिदीत नमाज पठन
दोन वर्षानंतर दिल्लीतील प्रसिद्ध जामा मशिदीत सामुहिक नमाज पठन करण्यात आले. यावेळी हजारोच्या संख्येने मुस्लीम अनुयायी जमले होते. तसेच मोठ्या प्रमाणात मशिदीत गर्दी आहे. नमाज पठन करून एकमेकांची गळाभेट घेण्यात आली. लहान मुलांपासून ते थोरांपर्यंत सगळ्यांची एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. तर लहान मुलांना ईदी भेट देण्यात आली.
07:02 May 03
काल तिसावा, आज ईद
हैदराबाद - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील 2 वर्ष निर्बंध असल्याने सर्व सण उत्सव शासनाच्या नियमावलीमध्ये साजरे करावे लागले. पण, यंदा शासनाने नियमावलीत शिथीलता आणल्याने यंदाची ईद ही मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. त्याबाबतची तयारी देखील मुस्लिम बांधवांच्या वतीने करण्यात आली आहे. गेला महिनाभर मुस्लिम बांधव रमजान महिन्याचे कडक उपवास करीत होते. पहाटे सहेरी करून सूर्यास्तानंतर इफ्तारी करत दिवसभराचा निर्जल उपवास सोडला जात होता. त्याशिवाय विशेष नमाज पठण केली जात होती. कुराणाचे देखील पठण करीत अल्लाहाचे नामस्मरण करून सुख, शांती बरोबर आयुष्यात येणारी संकटे दूर करण्याची दुआ मागण्यात आली. मुस्लिम बांधवांच्या रमजान महिन्याचा चंद्र काल दिसला. तर आज देशभरात रमजान ईद म्हणजे ईद उल फितर साजरी ( Eid-ul-Fitr 2022 ) होत आहे. सोमवारी महिन्याचा शेवटचा तिसावा उपवास ( रोजा ) करण्यात आला असून, आज देशभरात रमजान ईद उत्साहात साजरी होत आहे.
हेही वाचा- Eid-ul-Fitr 2022 : रमजान ईद म्हणजे काय?; कशी साजरी करतात, वाचा सविस्तर...
हेही वाचा -Akshaya Tritiya 2022 : अक्षय्य तृतीयाला दान-धर्माला का आहे विशेष महत्व?; पाहा, VIDEO...