महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Eid Al Adha 2023 : जगभरात ईद उल अजहाचा उत्साह, नेत्यांनी केला शुभेच्छांचा वर्षाव

देशभरात आज ईद उल अजहा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. बकरी ईदनिमित्त जगभरातील नेत्यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Eid Al Adha 2023
संपादित छायाचित्र

By

Published : Jun 29, 2023, 10:20 AM IST

हैदराबाद :जगभरातील मुस्लिम ईद-उल-अजहा अर्थात बलिदानाचा दिवस साजरा करत आहेत. इब्राहिमच्या विश्वासाचे स्मरण करण्यासाठी हा एक आनंदाचा प्रसंग आहे. तीन दिवसीय ईद दरम्यान, मुस्लिम बांधव बकऱ्याचा बळी देतात. या कापलेल्या बकऱ्याचे मांस गरिबांना वितरित करण्याची प्रथा आहे. ईद उल अदाच्या निमित्ताने जगभरातील नेत्यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

कांग्रेस नेते राहुल गांधींनी दिल्या शुभेच्छा :ईद मुबारक! हा शुभ सोहळा सर्वांना शांती, समृद्धी आणि आनंद घेऊन येवो, असे राहुल गांधी यांनी ट्विटरवर ग्रीटिंग कार्ड शेअर करत लिहिले आहे.

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनीही दिल्या शुभेच्छा :नवीन आणि जुन्या मित्रांसह ईद-उल-अदा साजरी करत आहे. आज दुपारी हाजी मित्राच्यासोबत पण आनंदाचा उत्साह साजरा करण्यात येणार आहे. देशभरात आणि जगभरातील मुस्लिमांना ईद मुबारक ! कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी एका उत्सवाचा व्हिडिओ शेअर करत अशा ट्विटरवर शुभेच्छा दिल्या आहेत.

हज यात्रेकरुंना तीव्र उष्णतेचा फटका :बुधवारी लाखो मुस्लिम यात्रेकरूंनी सौदी अरेबियातील हज यात्रेदरम्यान सैतानाचा प्रतिकात्मक दगडमार केली. यावेळी या हाजींना तीव्र उष्णता सहन करावी लागली. सकाळचे तापमान 42 अंश सेल्सिअस (107 अंश फॅरेनहाइट) च्या पुढे वाढल्याने, यात्रेकरूंचा मोठा जमाव चालत गेला. तर काही मक्का या पवित्र शहराच्या अगदी बाहेर असलेल्या विस्तीर्ण जमरात कॉम्प्लेक्समध्ये बसने गेला. येथे मोठे पादचारी पूल सैतानाचे प्रतिनिधित्व करणारे तीन विस्तीर्ण खांबांवरून पुढे जातात.

रात्री गोळा केलेले खडे वापरून मारतात :मुझदालिफा नावाच्या शिबिराच्या ठिकाणी आदल्या रात्री गोळा केलेले खडे वापरून, यात्रेकरू खांबांवर दगड मारतात. हे प्रेषित इब्राहिमच्या कथेचे पुनरुत्थान आहे. ख्रिश्चन आणि ज्यू परंपरांमध्ये अब्राहम म्हणून ओळखले जाते. त्याने मोहाचा प्रतिकार करण्यासाठी सैतानावर दगडफेक केली अशी अख्यायिका आहे.

हेही वाचा -

  1. Ashadhi Ekadashi 2023: हिंदू मुस्लिम एकतेचा अनोखा प्रयोग, पोलिसांच्या आवाहनाला मुस्लिम बांधवांचा 100 टक्के प्रतिसाद, कुर्बानी न करण्याचा निर्णय
  2. Bakri Eid 2023 : बकरी बाजारात कोट्यवधीची उलाढाल; 'या' बकऱ्यांना ग्राहकांची मोठी मागणी...

ABOUT THE AUTHOR

...view details