पणजीसोनाली फोगट खून प्रकरणात Sonali Phogat murder case कर्ली रेस्टॉरंटचा मालक एडविन नुनेस Edwin along आणि अन्य आरोपी दत्तप्रसाद गावकर Dattaprasad Gaonkar यांना या प्रकरणातील अटकेच्या एका दिवसानंतर गोव्यातील न्यायालयात हजर करण्यात आले आहे. सोनाली फोगट खून प्रकरणातील तीन आरोपी कर्लीजचा मालक एडविन नुनेस, ड्रग्ज विक्रेता रामा मांद्रेकर आणि दत्तप्रसाद गावकर यांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. नुनेस यांचा जामीन अर्ज गोवा न्यायालयाने फेटाळला आहे.
भाजप नेत्या सोनाली फोगट हत्या प्रकरण Sonali Phogat Murder Case अंजुना पोलिसांनी आणखी २ जणांना अटक केली Goa Police arrested two more accused आहे. गोवा पोलिसांनी कर्लीज रेस्टॉरंटच्या वॉशरूममधून सोनाली फोगटला दिलेले ड्रग जप्त केले आहे. मेटामेम्फेटामाइन असे त्या ड्रगचे नाव Metamemphatamine Drug to Sonali Phogat आहे. अधिक तपासात असे निष्पन्न झाले आहे की, हे ड्रग्ज दत्तप्रसाद गावकर याने पुरवले drugs supplied by Dattaprasad Gaonkar होते. गावकर हा हॉटेल ग्रँड लिओनी रिसॉर्ट अंजुना येथे रूम बॉय म्हणून काम करत होता. याच हॉटेलमध्ये सोनाली फोगट आणि तिचे सहकारी राहत होते.
गरज भासल्यास हे प्रकरण सीबीआयकडे सोपवूआज सर्व औपचारिकता संपवून, गरज भासल्यास हे प्रकरण सीबीआयकडे सोपवू, अशी माहिती गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सोनाली फोगट खून प्रकरणावर दिली आहे. ते म्हणाले, की हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी माझ्याशी संवाद साधला, सखोल चौकशीची विनंती केली. कुटुंबातील सदस्यांनी त्यांना भेटल्यानंतर आणि ते विचारल्यानंतर सीबीआयने ताब्यात घ्यावे अशी त्यांची इच्छा आहे. मला यात काही अडचण नाही. आज सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यावर, गरज भासल्यास हे प्रकरण सीबीआयकडे देऊ, असे त्यांनी सांगितले.