महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

ED summons to Charanjit Singh Channi : पंजाबचे माजी मुख्यमंत्री चन्नी अडचणीत; ईडीने चौकशीसाठी बजावले समन्स - चरणजीत सिंग बेकायदेशीर उत्खनन

पंजाबचे माजी मुख्यमंत्री नेते चरणजीत सिंग चन्नी यांचा पुतण्या भूपिंदर सिंग हनी याला सुमारे 100 दशलक्ष रुपये रोख, लाखोंचे सोने आणि महागडे घड्याळ मिळाले होते. या प्रकरणात ईडीने अटक ( ED arrest Bhupinder Singh ) केली. यानंतर, ईडीने भूपिंदरसिंग हनीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्रही दाखल ( ED case against Punjab leader ) केले होते.

पंजाबचे माजी मुख्यमंत्री चन्नी अडचणीत
पंजाबचे माजी मुख्यमंत्री चन्नी अडचणीत

By

Published : Apr 14, 2022, 3:06 PM IST

चंदीगड - पंजाबचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते चरणजीत सिंग चन्नी हे अडचणीत सापडले ( Charanjit Singh Channy trouble ) आहेत. चन्नी, त्यांचा पुतण्या भूपिंदर सिंग हनीनंतर आता ईडीच्या निशाण्यावर ( ED notice to form CM Punjab ) आला आहे. ईडीने चरणजीत सिंग चन्नी यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ईडीने चरणजित सिंग चन्नी यांना वाळू उत्खनन प्रकरणात ( illegal sand mining case ) चौकशी आणि अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या प्रकरणात समन्स बजावले आहे.

पंजाबचे माजी मुख्यमंत्री नेते चरणजीत सिंग चन्नी यांचा पुतण्या भूपिंदर सिंग हनी याला सुमारे 100 दशलक्ष रुपये रोख, लाखोंचे सोने आणि महागडे घड्याळ मिळाले होते. या प्रकरणात ईडीने अटक ( ED arrest Bhupinder Singh ) केली. यानंतर, ईडीने भूपिंदरसिंग हनीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्रही दाखल ( ED case against Punjab leader ) केले होते. त्यानंतर भूपिंदरसिंग हनी यांना न्यायालयाने 6 एप्रिल रोजी तुरुंगात पाठविले होते. या प्रकरणावरून ईडीकडून चरणजीत सिंग चन्नी यांची बेकायदेशीर खाणकाम प्रकरणात चौकशी केली जाऊ शकते.

काय आहे प्रकरण- भूपिंदरसिंग हनी यांच्यावर अवैध खाणकाम केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापैकी 8 कोटी रुपये मोहालीतील हनीच्या होम लँड सोसायटी सेक्टर 77 मधून जप्त करण्यात आले. त्याचा एक साथीदार असलेल्या संदीपच्या लुधियाना येथील राहत्या घरातून 2 कोटी रुपये जप्त करण्यात आले. ही सर्व कारवाई पंजाब पोलिसांनी 2018 मध्ये बेकायदेशीर वाळू उत्खनन प्रकरणात रोपर पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारे केली होती.

निवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव- कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी राजीनामा दिल्यानंतर पंजाबच्या मुख्यमंत्री पदावर आमदार चरणजीतसिंग चन्नी यांची वर्णी ( Charanjit Singh Channi lost both his seats ) लागली होती. कॅबिनेट मंत्री और तीन वेळा आमदार असलेले चन्नी हे पंजाबमध्ये पहिले मागासवर्गीय मंत्री होते. मात्र, त्यांना चमकौर साहिब व भदौड या दोन्ही जागांवर पराभव स्वीकारावा लागला आहे.

पंजाबमधील पहिलेच दलित मुख्यमंत्री-काँग्रेसमधील प्रदीर्घ संघर्ष आणि अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यानंतर ज्येष्ठ दलित नेते चरणजीत सिंह चन्नी यांची रविवारी पंजाबमधील पक्षाच्या विधिमंडळ पक्षाचे नवे नेते म्हणून निवड झाली. 58 वर्षीय चन्नी हे राज्याचे मुख्यमंत्री बनणारे पंजाबमधील पहिले दलित नेते आहेत. चन्नी दलित शीख (रामदासिया शीख) समाजातून येतात. ते अमरिंदर सरकारमध्ये तंत्रशिक्षण मंत्री होते. ते रूपनगर जिल्ह्यातील चमकौर साहिब विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. 2007 मध्ये ते प्रथमच या प्रदेशातून आमदार झाले. त्यानंतर ते सलग निवडणूक जिंकत आले आहेत. शिरोमणी अकाली दल-भाजप युती सरकारच्या काळात ते 2015-16 मध्ये विधानसभेतील विरोधी पक्षनेते होते.

हेही वाचा-Charanjit Singh Channi Lost Election : पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग यांना दोन्ही जागांवर मतदारांनी नाकारले, जाणून घ्या, त्याची कारकीर्द

हेही वाचा-नवज्योतसिंग सिद्धू यांनी पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याची 'ही' आहेत 5 कारणे

हेही वाचा-CM Charanjit Channi : बकरीचे दूध काढण्यासाठी सीएम चन्नी यांनी थांबविला वाहनाचा ताफा, व्हिडिओ झाला व्हायरल

ABOUT THE AUTHOR

...view details