महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

ED Seizes Chinese Company Funds : ईडीची बंगळुरूतील चीनी शैक्षणिक संस्थेवर कारवाई; 8.26 कोटी केले जप्त

बंगळुरूत चीनी शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून परकीय चलन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने मोठी कारवाई केली आहे. चीनी कंपनीचे 08.26 कोटी रुपये ईडीच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले आहेत.

ED Seizes Chinese Company Funds
संग्रहित छायाचित्र

By

Published : May 19, 2023, 2:08 PM IST

बंगळुरू :अंमलबजावणी संचालनालयाने ऑनलाईन एज्युकेशन संस्थेचा 08.26 कोटीचा निधी जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. ही ऑनलाईन एज्युकेशन संस्था चीनी नागरिक चालवत असल्याचे स्पष्ट झाले. या नागरिकाच्या ताब्यातून ही रक्कम जप्त करण्यात आली. पिजन एज्युकेशन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड असे त्या 08.26 कोटीचा निधी जप्त करण्यात आलेल्या संस्थेचे नाव आहे.

परकीय चलनाचे उल्लंघन केल्याने कारवाई :अंमलबजावणी संचालनालयाने शुक्रवारी याबाबतची कारवाई केली आहे. परकीय चलन कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे अंमलबजावणी संचालनालयाने ही निधी जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बंगळुरू येथील पिजन एज्युकेशन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडचा ही कंपनी चीनी नागरिक चालवत होता. त्याच्या ताब्यातून ही रक्कम जप्त करण्यात आली आहे. पिजन एज्युकेशन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडचा निधी फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट अ‍ॅक्ट (FEMA) च्या कलम 37A अंतर्गत जप्त करण्यात आल्याची माहिती अंमलबजावणी संचालनालयाकडून देण्यात आली आहे.

बंगळुरूतील कंपनीची मालकी चीनी नागरिकाची :चीनच्या या कंपनीने ओडाक्लास या ब्रँड नावाने ऑनलाइन शिक्षण दिल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र या कंपनीत परकीय चलनाच्या उल्लंघनामुळे या कंपनीवर कारवाई करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ED) एप्रिलमध्ये या कंपनीचा शोध घेतला. त्यावेळी पिजन एज्युकेशन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी 100 टक्के चीनी नागरिकांच्या मालकीची आहे. या कंपनीचे सर्व व्यवहार, आर्थिक निर्णय चीनमध्ये बसलेल्या व्यक्तींकडून घेतले जात असल्याचे अंमलबजावणी संचालनालयाने केलेल्या तपासात उघड झाले आहे.

चीनी कंपनीने हाँगकाँगला पाठवली मोठी रक्कम :पिजन एज्युकेशन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा संचालक लिऊ कॅन याच्या सूचनेनुसार कंपनीने मोठी रक्कम परदेशात पाठवली आहे. संचालक लिऊ कॅनने जाहिरात आणि विपणन खर्चाच्या नावाखाली चीन आणि हाँगकाँगला ८२.७२ कोटी रुपये पळवल्याचा आरोप अंमलबजावणी संचालनालयाने केला आहे. जाहिरात आणि विपणन खर्चाच्या नावाखाली केलेल्या खर्चाबाबत अंमलबजावणी संचालनालयाने तपास केला. यावेळी चीनी कंपनी तिच्या बाजूने सेवा मिळाल्याचा कोणताही पुरावा आणि या खर्चाच्या विरोधात प्रकाशित केलेल्या कोणत्याही जाहिरातीचा पुरावा सादर करू शकली नाही. त्यामुळे अंमलबजावणी संचालनालयाने ही कारवाई केल्याची माहिती अंमलबजावणी संचालनालयाकडून देण्यात आली आहे.

सोशल माध्यमात जाहिराती पब्लिश करुन उकळले पैसे :अंमलबजावणी संचालनालयाने केलेल्या तपासात कंपनीच्या डायरेक्टर आणि अकाउंट्स मॅनेजरने तपासादरम्यान महत्वाची माहिती दिली. या अकाउंट्स मॅनेजरने पेमेंट कॅनच्या सूचनेनुसारच केले गेले होते, अशी कबुली दिल्याची माहिती अंमलबजावणी संचालनालयाकडून देण्यात आली आहे. कंपनीचे भारतीय संचालक वेदांत हमीरवासिया यांनी चीनी संचालकाने या जाहिराती गुगल आणि फेसबुकच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आल्याची माहिती दिली आहे. मात्र या प्लॅटफॉर्मद्वारे कोणतेही बील सादर करण्यात आले नसल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा -

  1. CBI : गुप्त माहिती विदेशी एजन्सीला पुरवल्याबद्दल पत्रकारासह माजी नौसेना कमांडरला अटक
  2. Karnataka Gov Formation : कोणाची लागणार मंत्रिमंडळात वर्णी; सिद्धरामय्या, डीके शिवकुमार आज दिल्लीत घेणार पक्षश्रेष्ठींची भेट
  3. Rape Of Two Minor Girls : अनाथ मुलींना दत्तक घेऊन ६ वर्षे अत्याचार, अनोळखी व्यक्तीच्या तक्रारीनंतर चाईल्डलाईनकडून सुटका

ABOUT THE AUTHOR

...view details