महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

ED Raid at Sanjay Raut : संजय राऊत यांच्या घरावर ईडीचा छापा, अटक होण्याची शक्यता - ईडी संजय राऊत घरी छापा

शिवसेना नेते खासदार संजय राऊत ( Shiv Sena leader MP Sanjay Raut ) यांच्या मुंबईतील निवासस्थानी अंबलबजावणी संचालनालयाच्या ( ED Officers ) छापा टाकला. पत्रा चाळ आर्थिक गैरव्यवहारच्या प्रकरणात त्यांची याआधी तीन वेळा चौकशीही झाली आहे. आज ईडीने त्यांच्या घरावर छापा मारला. ईडी संजय राऊत यांना अटक करण्याची शक्यता आहे.

ED Raid at Sanjay Rau
संजय राऊत यांच्या घरावर ईडीचा छापा

By

Published : Jul 31, 2022, 7:47 AM IST

Updated : Jul 31, 2022, 12:08 PM IST

मुंबई -मुंबईतील पत्राचाळ प्रकरणात शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या ( Shiv Sena leader MP Sanjay Raut भांडूप येथील घरी आज ईडीने धडक देत कारवाईला सुरुवात केली. ईडीने यापूर्वी ( ED Officers दोनदा समन्स बजावले होते. संसदेचे अधिवेशन सुरू असल्याने राहू त्यांनी वेळ मागवून घेतली ( ED Raid Sanjay Raut home ) होती. मात्र सकाळपासूनच कारवाईला सुरुवात केल्याने राऊत यांच्या अटकेची शक्यता वर्तवली जात आहे.


मुंबईतील गोरेगाव येथील पत्राचाळ प्रकरणात अनियमितता आढळून आल्याने संजय राऊत यांची ईडीमार्फत चौकशी सुरू होती. पत्राचाळीत राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी याप्रकरणी ईडीकडे तक्रार केली होती. ईडीने राऊत यांना ईडीकडून वारंवार समन्स बजावण्यात आले होते. १ जुलै रोजी ईडीने १० तास चौकशी केली. त्यानंतर पुन्हा दोन वेळा संजय राऊत यांना समन्स बजावले. मात्र, संसदेचे अधिवेशन सुरू असल्याचे सांगत राऊत यांनी मुदत वाढ मिळावी, अशी मागणी केली होती. आज पहाटे ईडीच्या पथकाने राऊत यांच्या घरी धाड टाकली असून चौकशीला सुरूवात केली आहे. केंद्र आणि राज्य सरकारची सुरक्षा व्यवस्था घराबाहेर तैनात केली आहे.

संजय राऊत यांच्या घरावर ईडीचा छापा
सूडाचे राजकारण सुरू केल्याचा आरोप-संजय राऊत यांनी सूडाचे राजकारण सुरू असून ईडीला संपूर्ण सहकार्य करणार असल्याचे म्हटले होते. राऊत यांचे निकटवर्तीय आणि गुरु आशिष कंट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक प्रवीण राऊत यांना अटक केली आहे. प्रवीण राऊत यांनी एचडीआयएलचे राकेश वाधवान, सारंग वाधवान अन्य संचालकांना हाताशी घेत चाळ पुनर्विकासापोटी मिळणाऱ्या एफएसआय मधून अन्य बांधकाम विकासकांना विक्री केली. तब्बल १०७४ कोटी रुपये बेकायदा जमवले. मात्र पत्राचाळीचा एकही इंच पुनर्विकास केला नाही, असा संजय राऊत आरोप त्यांच्यावर आहे.

वकिलांमार्फत ईडीकडे वेळ मागितला-शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांना पुन्हा ईडीने चौकशी करिता मुंबईतील ( MP Sanjay Raut ED probe ) ईडी कार्यालयात हजर राहण्याचे समन्स बजावले होते. मात्र, लोकसभा अधिवेशनामुळे राऊत उपस्थित राहिले नसून त्यांनी 8 ऑगस्टपर्यंत वकिलांमार्फत ईडीकडे वेळ मागितला असण्याची माहिती मिळाली आहे. ( Shiv Sena MP Sanjay Raut ) गोरेगाव येथील पत्रा चाळ कथित घोटाळ्याप्रकरणी समन्स बजावले होते. यापूर्वी 7 जुलै रोजी 10 तास संजय राऊत यांची चौकशी करण्यात आली होती.

काय आहे पत्राचाळ घोटाळा ( Patra chawl corruption ) ? -मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा म्हाडा भूखंड आहे. पत्राचाळ जमीन घोटाळा 1,034 कोटी रुपयांचा आहे. पत्राचाळमध्ये राहणाऱ्या 672 भाडेकरूंना सदनिका देण्याची योजना सरकारने आखली. तेव्हा हा घोटाळा सुरू झाला. ही चाळ विकसित करण्याचे कत्रांट महाराष्ट्र गृहनिर्माण व विकास प्राधिकरणाने प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन या कंपनीला दिले होते.

Last Updated : Jul 31, 2022, 12:08 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details