रायपुर:कोळसा घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून छत्तीसगडमध्ये छापे टाकण्यात आले आहेत. छत्तीसगडमधील काँग्रेस नेते राष्ट्रीय अधिवेशनाच्या तयारीत व्यस्त असताना हे छापे टाकण्यात आले आहेत. यावेळी सकाळी 5 वाजल्यापासून ईडी काँग्रेस नेत्यांच्या घरी पोहोचली आहे. प्रदेश काँग्रेस कमिटीचे कोषाध्यक्ष राम गोपाल अग्रवाल, प्रवक्ते आरपी सिंह, कामगार कल्याण विभागाचे अध्यक्ष सनी अग्रवाल, महासचिव रवी घोष, भिलाईचे आमदार देवेंद्र यादव यांच्या घरांवर छापे टाकण्यात आले आहेत.
हिंडेनबर्ग वादावर पंतप्रधानांचे मौन : काँग्रेसचे मीडिया प्रभारी जयराम रमेश म्हणाले, 'आज सकाळी जे काही पाहिलं ते थर्ड-रेट राजकारणाचं उदाहरण आहे. हा राजकीय सूड आहे. अशा कोणत्याही कारवाईला आम्ही घाबरत नाही. चिनी घुसखोरी आणि अदानी-हिंडेनबर्ग वाद यांसारख्या मुद्द्यांवर पंतप्रधान मौन बाळगतात. परंतु, पूर्ण अधिवेशनाच्या काही दिवस आधी काँग्रेस नेत्यांना ईडीकडे पाठवतात असा घाणाघात यावेली जयराम रमेश यांनी केला आहे.
भारत जोडो यात्रेमुळे सरकार हादरले : पहाटे 5 वाजता छापा सुरू झाला आणि तो किती काळ सुरू राहील हे माहीत नाही. आमच्या पूर्ण अधिवेशनाच्या तीन दिवस आधी हे छापे पडले. आमचे बहुतेक नेते 23 फेब्रुवारीपासून रायपूरला पोहोचण्यास सुरुवात करतील आणि 24 फेब्रुवारीपासून नियोजनानुसार काम केले जाईल. भारत जोडो यात्रा यशस्वी झाल्याने केंद्र सरकार हादरले आहे. आणि त्यामुळेच म्हणून हे छापे टाकण्यात आल्याचा दावा रमेश यांनी केला आहे.