नवी दिल्ली: दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ( Money laundering case ) अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी पुन्हा एकदा छापे टाकले. अधिकृत सूत्रांनी ही माहिती दिली. दिल्ली सरकारने आता हे धोरण मागे घेतले आहे. सूत्रांनी सांगितले की, ईडीचे अधिकारी दिल्ली, पंजाब आणि हैदराबादमध्ये 35 ठिकाणी छापे टाकत आहेत. काही दारू वितरक, कंपन्या आणि त्यांच्याशी संबंधित संस्थांचा शोध घेतला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
ED Raids : दिल्ली दारू धोरण घोटाळा; ईडीची दिल्ली, हैदराबाद आणि पंजाबमध्ये 35 ठिकाणी छापेमारी - Enforcement in money laundering cases
दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ( Money laundering case ) अंमलबजावणी ( Enforcement in money laundering cases ) संचालनालयाने (ED) शुक्रवारी पुन्हा एकदा छापे टाकले.
या प्रकरणी ईडीने आतापर्यंत 103 हून अधिक ठिकाणी छापे टाकले आहेत. या प्रकरणी मद्य व्यावसायिक आणि मद्य निर्माता कंपनी 'इंडोस्पिरिट'चे व्यवस्थापकीय संचालक समीर महेंद्रू यांना गेल्या महिन्यात अटक करण्यात आली होती. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) या प्रकरणात एफआयआर नोंदवल्यानंतर ईडीने मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल केला होता. दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर व्हीके सक्सेना यांनी दिल्ली उत्पादन शुल्क धोरण २०२१-२२ च्या अंमलबजावणीतील कथित अनियमिततेची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस केली होती. याप्रकरणी त्यांनी उत्पादन शुल्कच्या 11 अधिकाऱ्यांना निलंबितही केले होते.
दुसरीकडे, सीबीआय एफआयआरमध्ये असा आरोप आहे की उपमुख्यमंत्री सिसोदिया यांचा कथित सहकारी अर्जुन पांडे याने एंटरटेनमेंट आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचे माजी सीईओ विजय नायर यांच्या वतीने समीर महेंद्रू यांच्याकडून सुमारे 2-4 कोटी रुपये रोख घेतले.