रांची ( झारखंड ) : केंद्रीय तपास यंत्रणेमार्फत झारखंड आणि बिहारमध्ये सात ठिकाणी छापे टाकण्यात ( ED raid in Muzaffarpur ) आले. हे प्रकरण निलंबित IAS पूजा सिंघल आणि खाण घोटाळ्याशी संबंधित ( Pooja Singhal mining scam case ) आहे. रांचीमध्ये एकूण 6 ठिकाणी तर बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये एका ठिकाणी छापे टाकण्यात आले.
राजधानी रांचीमध्ये विशाल चौधरी नावाच्या व्यक्तीच्या ठिकाणी ईडीच्या टीमने छापा टाकला. रांचीच्या अशोक नगर रोड क्रमांक 6 मध्ये विशाल चौधरी याचे आलिशान घर आहे. विशाल चौधरीबद्दल सांगितले जात आहे की, तो अनेक आयएएस अधिकाऱ्यांच्या जवळचा आहे. काळा पैसा पांढरा करण्याचे काम तो करत असे. ईडीची टीम सध्या विशाल चौधरी आणि त्याच्या अनेक जवळच्या मित्रांवर छापे टाकत आहे. हे संपूर्ण प्रकरण पूजा सिंघल प्रकरणाशी संबंधित आहे.