नवी दिल्ली -नॅशनल हेराल्डशी संबंधित कथित मनी ( Sonia Gandhi questioning by ed ) लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी ( Sonia Gandhi ed inquiry ) यांची सहा तासांपेक्षा जास्त काळ चौकशी केली. आजही सोनिया गांधी ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाल्या आहेत. सोनिया गांधी यांना बुधवारी पुन्हा हजर राहण्यास सांगितले होते. मंगळवारी, आपले म्हणणे नोंदवल्यानंतर सोनिया गांधी संध्याकाळी 7 वाजण्याच्या आधी ईडी कार्यालयातून बाहेर पडल्या. सोनिया गांधी झेड प्लस सुरक्षेत त्यांचा मुलगा राहुल गांधी आणि मुलगी प्रियांका गांधी वाड्रा यांच्यासोबत सकाळी 11 च्या सुमारास ईडीच्या कार्यालयात पोहचल्या होत्या.
सोनिया गांधी आजही 'ईडी' कार्यालयात चौकशीला हजर, काल 6 तासांहून अधिक काळ चौकशी - sonia gandhi questioning by ed
नॅशनल हेराल्डशी संबंधित कथित मनी ( Sonia Gandhi questioning by ed ) लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी ( Sonia Gandhi ed inquiry ) यांची सहा तासांपेक्षा जास्त काळ चौकशी केली. आजही चौकशीसाठी त्या ईडी कार्यालयात हजर झाल्या आहेत.
![सोनिया गांधी आजही 'ईडी' कार्यालयात चौकशीला हजर, काल 6 तासांहून अधिक काळ चौकशी sonia gandhi questioning by ed](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-15935000-thumbnail-3x2-op.jpg)
प्रियांका गांधी ईडीच्या कार्यालयात थांबल्या, तर राहुल लगेच निघून गेले. सोनिया गांधी यांना भेटता यावे व गरज पडल्यास त्यांना औषधी किंवा वैद्यकीय मदत देता यावी यासाठी प्रियांका गांधी ईडी कार्यालयाच्या दुसर्या खोलीत राहिल्या. काँग्रेस अध्यक्ष एकदा दुपारी 2 वाजता ईडी कार्यालयातून बाहेर पडल्या होत्या आणि दुपारी 3.30 च्या सुमारास त्या परतल्या, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
समन्सची पडताळणी, हजेरी पत्रकावर स्वाक्षरी यासह प्राथमिक औपचारिकता पूर्ण केल्यानंतर सकाळी 11.15 वाजता सोनिया गांधी यांची चौकशी सुरू करण्यात आल्याचे समजते. 21 जुलै रोजी सोनिया गांधी (75) यांची पहिल्यांदा दोन तासांहून अधिक काळ चौकशी करण्यात आली. रायबरेलीच्या खासदार गांधी यांनी त्यानंतर एजन्सीच्या 28 प्रश्नांची उत्तरे दिली होती. सोनिया गांधी यांना 'नॅशनल हेराल्ड' आणि 'यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेड' या वृत्तपत्रातील सहभागाबाबत प्रश्न विचारण्यात आल्याचे समजते.