नवी दिल्ली - अंमलबजावणी संचालनालय (ED) 'नॅशनल हेराल्ड' या वृत्तपत्राशी संबंधित कथित मनी लाँड्रिंग प्रकरणासंदर्भात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी चौकशी करण्यात येत आहे. ( National Herald opinion ) ईडीने मंगळवारी त्यांची 11 तास आणि सोमवारी 10 तासांपेक्षा जास्त वेळ चौकशी केली. तर, दुसरीकडे काँग्रेस नेत्यांना काँग्रेस मुख्यालयात जाण्यापासून रोखण्यात आले आहे. अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आली. काँग्रेसच्या अनेक नेत्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
काँग्रेस कार्यालयात पोलीस घुसल्याने कार्यकर्त्यांमध्ये संताप आहे. यादरम्यान बाचाबाचीही झाली. काँग्रेस नेते जितेंद्र सिंह यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. याला त्यांनी लोकशाहीची हत्या म्हटले आहे. ( ED questions Rahul Gandhi ) स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच देशातील प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस पक्षाच्या मुख्यालयात घुसून पोलिसांनी लाठीचार्ज करून कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचे अत्यंत लज्जास्पद आणि भ्याड कृत्य आहे असही ते म्हणाले आहेत.