नवी दिल्ली - अंमलबजावणी संचालनालयाने ( ED ) पश्चिम बंगालमधील कथित कोळसा घोटाळ्याशी ( West Bengal Coal Scam ) संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तृणमूल काँग्रेसचे नेते आणि खासदार अभिषेक बॅनर्जी ( ED Summons TMC MP Abhishek Banerjee ) आणि त्यांच्या पत्नीला चौकशीसाठी समन्स बजावले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ( Mamta Banerjee ) यांचे पुतणे आणि तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी आणि त्यांची पत्नी रुजिरा बॅनर्जी यांना पुढील आठवड्यात तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाने 11 मार्च रोजी त्यांना संचालनालयासमोर हजर राहण्यासाठी बजावलेल्या समन्सला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावली होती. मागील वर्षी 10 सप्टेंबर रोजी दोघांनाही समन्स बजावण्यात आले होते. त्यानंतर आम्ही पश्चिम बंगालमध्ये राहत असून आम्हाल दिल्लीत हजर राहण्यासाठी समन्स जारी करू नये, अशी विनंती त्यांनी ईडीकडे केली होती.