कोलकता -शालेय भरती घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात ( Ed found crores of cash in arpita mukherjee flat ) आलेले पश्चिम बंगालचे उद्योग मंत्री पार्थ चॅटर्जी यांची जवळची सहकारी मानल्या जाणाऱ्या अर्पिता मुखर्जीच्या बेलघारिया येथील दुसर्या फ्लॅटमध्ये ईडीला ( Ed raid arpita mukherjee flat in belgharia ) बुधवारी पुन्हा मोठ्या प्रमाणात रोकड सापडली. यापूर्वी तिच्या एका मालमत्तेतून २० कोटी रुपये जप्त करण्यात आले होते. मात्र, काल झालेल्या छाप्यात 28 कोटींचे घबाड ( 28 crore in arpita mukherjee flat in belgharia ) सापडले आहे. यामुळे आता अर्पिताच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहे.
हेही वाचा -A Wild Elephant Entered School : जंगली हत्तीने घातला शाळेत धुमाकूळ; पाहा व्हिडिओ
23 जुलै रोजी अर्पिताला अटक केले - केंद्रीय एजन्सीने अर्पिता मुखर्जी हिच्या दक्षिण कोलकाता येथील फ्लॅटमधून 21 कोटी रुपयांहून अधिक किमतीची बेहिशेबी रोकड बाहेर काढल्यानंतर तिला अटक केली होती. यावेळी, शहराच्या उत्तरेकडील बेलघारिया येथे तिच्या मालकीच्या दुसर्या अपार्टमेंटमध्ये 21 कोटी सापडले आहेत. बेलघारियाच्या रथताला येथील दोन फ्लॅटमध्ये जाण्यासाठी ईडीच्या गुप्तचरांना दरवाजा तोडावा लागला. दरवाजे उघडण्याच्या चाव्या दिसल्या नसल्याने ईडीला हे करावे लागले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.