महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कर्नाटकातील हुबळी येथील फटाक्यांच्या कारखान्याला आग, जखमी तिघांचा रुग्णालयात मृत्यू - फटाक्यांच्या कारखान्यात आग कर्नाटक

कर्नाटकातील हुबळी येथील एका फटाक्यांच्या कारखान्यात शनिवारी भीषण आग ( fire broke in sparker factory hubli ) लागली. ज्यामध्ये जखमींपैकी तीन जणांचा रुग्णालयात मृत्यू झाल्याची माहिती ( Three Died In Hubli Factory Fire ) आहे.

FIRE ACCIDENT AT FACTORY IN HUBLI KARNATAKA
कर्नाटकातील हुबळी येथील फटाक्यांच्या कारखान्याला आग, जखमी तिघांचा रुग्णालयात मृत्यू

By

Published : Jul 24, 2022, 3:49 PM IST

हुबळी (कर्नाटक): तारिहाला औद्योगिक क्षेत्रातील एका स्पार्कलर कारखान्याला शनिवारी लागलेल्या आगीत ( fire broke in sparker factory hubli ) जखमी झालेल्या तिघांचा हुबली KIMS रुग्णालयात मृत्यू ( Three Died In Hubli Factory Fire ) झाला. गंभीर अवस्थेत असलेल्या एका महिलेचा शनिवारी रात्री उशिरा मृत्यू झाला, तर उपचाराअभावी रविवारी आणखी दोघांचा मृत्यू झाला.

गदग जिल्ह्यातील विजयालक्ष्मी वीरभद्रप्पा याच्छानगर या महिलेचा रात्री उशिरा मृत्यू झाला. तर गौरव (45) आणि मलेशा (27) यांनी आज सकाळी अखेरचा श्वास घेतला. या घटनेत एकूण 8 जण जखमी झाले असून उर्वरित पाच जणांवर KIMS मध्ये उपचार सुरू आहेत. कारखान्यात गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन आग लागल्याचा अंदाज आहे.

कर्नाटकातील हुबळी येथील फटाक्यांच्या कारखान्याला आग, जखमी तिघांचा रुग्णालयात मृत्यू

हुबळीच्या तरिहाळा औद्योगिक परिसरात काल स्पार्कलर बर्थडे मेणबत्त्या बनवणाऱ्या कारखान्यात आग लागली. या घटनेत आठ जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना KIMS रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा कारखाना १५ दिवसांपूर्वी सुरू झाला असून, तो अनधिकृत असल्याचे सांगण्यात येत आहे.

घटनेपासून मालक तबस्सुम शेख फरार असल्याची माहिती मिळाली आहे. घटनास्थळी भेट दिल्यानंतर आमदार अरविंद बेल्लाड म्हणाले की, हा कारखाना १५ दिवसांपूर्वी सुरू झाला होता. हा कारखाना अनधिकृत आहे. कारखान्याचे मालक तबस्सुम शेख घाबरून पळून गेले. पोलीस विभाग या घटनेचा तपास करत असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा :Solapur NTPC FGD Plant Fire : सोलापुरातील एनटीपीसीच्या एफजीडी प्लांटमध्ये भीषण स्फोट

ABOUT THE AUTHOR

...view details