कोलकाता: पश्चिम बंगालचे कॅबिनेट मंत्री आणि राज्याचे माजी शिक्षण मंत्री पार्थ चॅटर्जी ( WB Minister Partha Chatterjee ) यांची एसएसकेएम हॉस्पिटलमधून कमांड हॉस्पिटलमध्ये रवानगी केल्याप्रकरणी ईडीने कोलकाता उच्च न्यायालयात नवीन याचिका दाखल केली ( ED filed fresh plea in Calcutta High Court ) आहे. या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. दुसरीकडे अर्पिता मुखर्जीला न्यायालयात हजर करण्यात आले. अर्पिताने जामिनासाठी अर्ज केला होता, तर ईडीने तिच्या जामिनाला विरोध केला. अर्पिता मुखर्जीच्या रिमांडची ईडीची मागणी कोर्टात केली असता अर्पिताला एक दिवसाच्या ईडी रिमांडवर पाठवण्यात आले ( One Day ED Custody Arpita Mukherjee ) आहे.
कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बिबेक चौधरी यांचे एकल खंडपीठ या याचिकेवर सुनावणी करणार आहे. ईडीने आज पूर्वी पश्चिम बंगालचे कॅबिनेट मंत्री पार्थ चॅटर्जी यांची एसएसकेएम हॉस्पिटलमधून कमांड हॉस्पिटलमध्ये एसएससी भरती घोटाळ्याच्या चौकशीचा एक भाग म्हणून बदलीसाठी याचिका दाखल केली.
त्याचवेळी पश्चिम बंगालचे कॅबिनेट मंत्री आणि माजी शिक्षण मंत्री पार्थ चॅटर्जी यांची जवळची सहकारी अर्पिता मुखर्जी हिला एसएससी घोटाळ्याप्रकरणी ईडीने न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने अर्पिताला एक दिवसाची ईडी कोठडी सुनावली आहे.