मुंबईED attaches properties National Herald - ई़डीनं दिल्लीमधील 'नॅशनल हेराल्ड'चं कार्यालय आणि लखनौमधील नेहरू भवन आणि 'नॅशनल हेराल्ड'चे शेअर्स अशी एकूण ७५२ कोटी रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता जप्त केली आहे. ईडीकडून काँग्रेस प्रवर्तक असलेल्या 'नॅशनल हेराल्ड' न्यूजपेपर आणि कंपनीचा मनी लाँड्रिंग प्रकरणात तपास सुरू आहे. पाच राज्यांची निवडणूक सुरू असताना ईडीनं ही मोठी कारवाई केल्यानं राजकीय वातावरण तापलं आहे.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे एक्स या सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं आहे की, "भाजपाचा पाच राज्यांच्या निवडणुकीत पराभव होणार आहे. अशावेळी भाजपाकडून तपास संस्थांचा काँग्रेसविरोधात गैरवापर होत आहे. अशा प्रकारे भाजपाकडून तपासंस्थांचा गैरवापर होणं ही नवीन गोष्ट नाही. आता संपूर्ण देशासमोर हे उघड झालं आहे. ज्या आदर्शतत्त्वावर भारताच्या प्रजासत्ताकाची स्थापना झाली, त्याचं संरक्षण करण्यासाठी काँग्रेसकडून लढा सुरुच राहणार असल्याचा निर्धार मल्लिकार्जून खर्गे यांनी व्यक्त केला. काँग्रेसचा देशाच्या नागरिकांवर पूर्ण विश्वास असल्याचंही काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी म्हटलं.
अभिषेक सिंघवी यांची भाजपावर टीका-काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते अभिषेक सिंघवी यांनी म्हटले की, सध्या सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव होत असताना भाजपाकडून इतरत्र लक्ष वळवण्याचा प्रयत्न आहे. भाजपाच्या आघाडीत सहभागी झालेली सीबीआय, ईडी किंवा प्राप्तिकर भाजपाला पराभवापासून वाचवू शकत नाही. राजकीय सूड घेण्याचं तंत्र हे काँग्रेसला घाबरवू शकत नाही. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात 'नॅशनल हेराल्ड'नं महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मात्र, काँग्रेसशी संलग्न असल्यानं आणि काँग्रेसला वारसा असल्यानं ईडीनं कारवाई केली आहे. ई़़डीनं दिल्लीच्या आयटीओमधील नॅशनल हेराल्डचं कार्याल, लखौमधील कैसरबाग जवळील मॉल एव्हेन्यूमधील नेहरू भवन आणि मुंबईमधील हेराल्ड हाऊसवर जप्तीची कारवाई केल्याचं सूत्रानं सांगितलं.
- ईडीचा काय आहे दावा? मनी लाँड्रिग प्रकरणात असोसिएटेड जर्नल्स लि (AJL) आणि यंग इंडियन (YI) कंपनीच्या मालमत्तेवर तात्पुरती जप्ती आणण्यात आली आहे. ही मालमत्ता ७५१.९ कोटी रुपयांची आहे.