महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Money Laundering Case : सुपरटेकचे संचालक आरके अरोरा यांना मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीकडून अटक - रिअल इस्टेट कंपनी सुपरटेक

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी रिअल इस्टेट कंपनी सुपरटेकचे अध्यक्ष आरके अरोरा यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली. मंगळवारी तिसर्‍या फेरीनंतर अरोरा यांना ताब्यात घेण्यात आले. सुपरटेकचे अध्यक्ष आरके अरोराला आज विशेष पीएमएलए न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता आहे.

सुपरटेकचे संचालक आरके अरोरा यांना
सुपरटेकचे संचालक आरके अरोरा यांना अटक

By

Published : Jun 28, 2023, 9:21 AM IST

नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, रिअल इस्टेट कंपनी सुपरटेकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आर के अरोरा यांना मंगळवारी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली. ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आरके आरोरा यांची तीन दिवस चौकशी केली होती. ईडीने आरके आरोराला सन्मस देत चौकशीसाठी बोलवले होते, त्यानंतर आरोरा यांना पीएमएलए अंतर्गत अटक करण्यात आली आहे.

रिमांडची मागणी : याआधी सुपरटेक ऑफ कंपनी आणि संचालकांविरोधात दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेशच्या वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. यानंतर ईडीने पीएमएलएच्या अंतर्गत त्याची चौकशी सुरू केली. दरम्यान एप्रिलच्या सुरुवातीला ईडीने त्यांच्या मालमत्ता जप्त केल्या होत्या. ईडीने प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग कायद्याच्या तरतुदींनुसार उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमधील सुपरटेक ग्रुप ऑफ कंपनी आणि त्यांच्या संचालकांच्या 40.39 कोटी रुपयांच्या 25 स्थावर मालमत्ता तात्पुरत्या जप्त केल्या होत्या. अधिकृत सूत्रांनी सांगितले की, अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आरके आरोरा यांना आज बुधवारी येथील विशेष पीएमएलए न्यायालयात हजर करण्याची शक्यता आहे. येथे ईडी त्यांच्या पुढील रिमांडची मागणी करेल.

ग्राहकांना गंडा : एप्रिलमध्ये ईडीने निवेदनात म्हटले होते की, कंपनी आणि तिचे संचालकांनी त्यांच्या रिअल इस्टेट प्रकल्पांमध्ये फ्लॅट बूक केलेल्या ग्राहकांना गंडा घातला होता. फ्लॅट घेणाऱ्या ग्राहकांकडून कंपनी आणि संचालकांनी अॅडव्हास रक्कम घेतली होती. पैसे घेतल्यानंतरही ग्राहकांना फ्लॅटवर ताबा दिला नव्हता. त्याचबरोबर या प्रकल्पांच्या नावाने कंपनीने बँकांकडून कर्ज घेतले होते, त्याचा हा गैरवापर करण्यात आला. ईडीने आरके आरोरा यांची याविषयी चौकशी केली. परंतु ईडीला समाधानकारक उत्तरे मिळाली नसल्याने ईडीने त्यांना अटक केली.

बँकेत आहेत डिफॉल्ट : बँकांकडून घेतलेल्या कर्जाचा गैरवापर करून इतर समूह कंपन्यांच्या नावे जमीन खरेदी करण्यात आली. बँका आणि वित्तीय संस्थांकडून कर्ज घेण्यासाठी या जमिनी परत तारण म्हणून पुन्हा तारण ठेवण्यात आल्या होत्या. एजन्सीने म्हटले होते की, सुपरटेक समूहाने बँका आणि वित्तीय संस्थांना दिलेल्या पेमेंटमध्येही 'डिफॉल्ट' आहेत. सध्या, कंपनीसाठी सुमारे 1 हजार 500 कोटी रुपयांची कर्जे ही अनुत्पादित मालमत्ता (NPA) बनली आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details