महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 5, 2022, 6:40 PM IST

ETV Bharat / bharat

Manish Sisodia PA Arrested : मनीष सिसोदिया यांच्या पीएला अटक; आरोप-प्रत्यारोप सुरू

दिल्ली सरकारच्या नवीन उत्पादन शुल्क धोरण घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या ईडीने शनिवारी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचे पीए देवेंद्र शर्मा (रिंकू) यांना अटक केली (Manish Sisodia PA Devendra Sharma arrested) आहे. याबाबतची माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिली आहे. सध्या या (Delhi liquor scam) घोटाळ्यावरून दिल्लीतील वातावरण चांगलेच तापले (Manish Sisodia PA Arrested) आहे.

Etv Bharat
Etv Bharat

नवी दिल्ली - दिल्ली सरकारच्या नवीन उत्पादन शुल्क धोरण घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या ईडीने शनिवारी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचे पीए देवेंद्र शर्मा (रिंकू) यांना अटक केली (Manish Sisodia PA Devendra Sharma arrested) आहे. याबाबतची माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिली (Delhi liquor scam) आहे. सध्या या घोटाळ्यावरून दिल्लीतील वातावरण चांगलेच तापले (Manish Sisodia PA Arrested) आहे. त्यामुळे सध्या आप विरुद्ध भाजप असा सामना दिल्लीत सुरू आहे. या अटकेनंतर सिसोदिया यांनी ट्विट करत भाजपवर निशाषा साधला आहे.

मनीष सिसोदिया यांचे ट्विट

सिसोदिया यांचे भाजपवर आरोप - सिसोदिया यांनी दावा केला आहे की, त्यांच्या पीएला अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली आहे. देवेंद्र शर्मा दिल्लीतील मंडवली येथे राहतात. ट्विटमध्ये सिसोदिया म्हणाले की, 'त्यांनी खोट्या एफआयआरद्वारे माझ्या घरावर छापा टाकला, बँक लॉकर्सची झडती घेतली, माझे गाव तपासले पण माझ्याविरुद्ध काहीही आढळले नाही, आज त्यांनी माझ्या पीएच्या घरी छापा टाकला, तिथेही काहीही मिळाले नाही. पीए सापडले तर आता त्याला अटक करून घेऊन गेले आहेत. भाजपवाले!'. त्याचवेळी सिसोदिया यांच्या या दाव्यावर भाजपने म्हटले की, कायदा आपले काम करत आहे.

काय आहे प्रकरण -दिल्लीतील नवीन उत्पादन शुल्क धोरणातील भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआयने 19 ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थान, कार्यालय आणि इतर ठिकाणी छापे टाकले होते. त्यानंतर दिल्लीसह देशातील इतर शहरांमध्येही ईडीने छापे टाकले. दिल्ली सरकारने गेल्या वर्षी लागू केलेले नवीन उत्पादन शुल्क धोरण, जे आता मागे घेण्यात आले आहे, लेफ्टनंट गव्हर्नर विनय कुमार सक्सेना यांनी ऑगस्टमध्ये सीबीआयला नवीन उत्पादन शुल्क धोरणाच्या अंमलबजावणीतील अनियमितता आणि भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची शिफारस केली होती.

सिसोदिया यांचे ट्विट चर्चेत - मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. खोटा एफआयआर करून माझ्या घरावर छापे मारण्यास सांगितले. बँकेच्या लॉकरची झडती घेतली. माझ्या गावात तपास केला. मात्र, माझ्याविरोधात त्यांना काहीही मिळालं नाही. आज यांनी माझ्या पीएच्या घरावर छापा मारला. तेथेही काही सापडलं नाही. त्यामुळे आता त्यांना अटक केली आहे. भाजपवाल्यांना निवडणुकीत पराभव होण्याची एवढी भीती, असं सिसोदिया म्हणाले. सिसोदिया यांनी एका अन्य ट्विटमध्ये भाजपवर गंभीर आरोप केले. महापालिका निवडणूक आणि गुजरातमध्ये मोठा पराभव होईल या भीतीने भाजपने (BJP) तिहार जेलमध्ये कैद असलेल्या एका ठगासमवेत डील केली आहे. तो रोज केजरीवाल यांच्याविरोधात तथ्यहीन आरोप करेल आणि त्या बदल्यात भाजप त्याला या प्रकरणात मदत करेल. पुढच्या आठवड्यात जे. पी. नड्डा हे त्याला भाजपमध्ये प्रवेश देतील असे मी ऐकले आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला.

ABOUT THE AUTHOR

...view details