नवी दिल्ली -सक्त अंमलबजावणी संचालनालयाने मुक्त पत्रकार राजीव शर्माला अटक केली आहे. हा पत्रकार चीनच्या गुप्तचर अधिकाऱ्यांना संवेदनशील माहिती देत असल्याचा आरोप आहे. पैशासाठी व्यवसायाचा प्रामाणिकपणा विकणाऱ्या या पत्रकाराला ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली आहे.
पीएमएलए कायद्यानुसार राजीव शर्माला १ जुलैला अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी शर्माला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. ईडीच्या माहितीनुसार ६२ वर्षीय राजीव शर्माने भारतीय सुरक्षा आणि राष्ट्रीय हिताशी तडजोड करत चीनच्या गुप्तचर अधिकाऱ्यांना गोपनीय आणि संवेदनशील माहिती दिली आहे.
हेही वाचा-WHO WARNING डेल्टाचा स्ट्रेन सतत बदलत असल्याने जग अत्यंत धोकादायक स्थितीत
चिनी कंपन्यांच्या माध्यमातून हवाला रॅकेट
शर्मा हा चिनी कंपन्यांच्या माध्यमांतून हवालाच्या व्यवहारात सहभागी असल्याचेही ईडीला आढळले आहे. हे हवाला रॅकेट चिनी नागरिक झांग चेंग उर्फ सुरज, झांग लिक्सिया उर्फ उषा आणि क्विंग शी आणि नेपाळी नागरिक शेर सिंह उर्फ राज बोहरा चालवित होते. विविध चिनी कंपन्यांसह काही व्यापारी कंपन्यांबरोबर करण्यात आलेल्या आर्थिक व्यवहाराचीही ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. चीनच्या गुप्तचर संस्थांकडून शर्मापर्यंत पैसे पोहोच करण्यासाी चीनी कंपन्यांचा वापर करण्यात येत होता.
हेही वाचा-कोव्हॅक्सिन कोरोनावर ७७.८ टक्के प्रभावी; तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचे निष्कर्ष
काय आहे नेमके प्रकरण?
राजीव शर्माला १४ डिसेंबर २०२० मध्ये दिल्लीमधील जनकपुरी येथे अटक करण्यात आले होते. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या माहितीनुसार राजीव शर्माला ऑफिशियल सिक्रेट्स कायद्यानुसार अटक करण्यात आली होती. त्याच्याकडून पोलिसांनी संरक्षण विभागाशी संबंधित गोपनीय कागदपत्रे जप्त केली होती. राजीव शर्माकडून मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी चिनी महिला आणि मूळ नेपाळी असलेल्या व्यक्तीलाही अटक केली आहे. अटकेतील आरोपी हे शर्माला बनावट कंपन्यांच्या माध्यमातून पैसे पुरवित असल्याचे समोर आले.
हेही वाचा-पुष्कर सिंह धामी यांची उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदी निवड; आजच घेणार पदाची शपथ