कोलकाता ( पश्चिम बंगाल ) : कथित शिक्षक भरती घोटाळ्याच्या ( Bengal SSC Scam ) चौकशीच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शनिवारी पश्चिम बंगालचे मजी मंत्री पार्थ चॅटर्जी यांना अटक ( partha chatterjee arrested ) केली. एजन्सीच्या एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. कथित घोटाळा झाला तेव्हा चटर्जी राज्याचे शिक्षणमंत्री होते. तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस चटर्जी यांना जवळपास २६ तासांच्या चौकशीनंतर अटक करण्यात आली. ( bengal teachers recruitment scam )
परवानगी घेतली नाही : तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते कुणाल घोष म्हणाले, "आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. योग्य वेळी आम्ही या प्रकरणी निवेदन जारी करू." दरम्यान, विधानसभा अध्यक्ष बिमन बॅनर्जी म्हणाले की, अंमलबजावणी संचालनालयाने विधानसभेच्या कोणत्याही सदस्याला अटक करण्यापूर्वी त्याची माहिती सभापतींना द्यावी. ते म्हणाले, "ईडी किंवा सीबीआय (सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन) यांनी कोणत्याही खासदार किंवा आमदाराला अटक करताना लोकसभा किंवा विधानसभेच्या अध्यक्षांना याची माहिती द्यावी लागते. हा घटनात्मक नियम आहे, परंतु मला याबाबत ईडीकडून कोणतीही माहिती नाही."
अर्पिता मुखर्जीही ताब्यात :ईडीने चॅटर्जीची जवळची सहकारी अर्पिता मुखर्जी हिलाही ताब्यात घेतले, तिच्या ताब्यातून २१ कोटी रुपये रोख जप्त करण्यात आले, असे एजन्सीच्या अधिकाऱ्याने सांगितले. ईडीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, "शुक्रवारी सकाळपासून चॅटर्जी आमच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करत नव्हते जे त्यांची चौकशी करत होते. त्याला नंतर न्यायालयात हजर केले जाईल."